एक्स्प्लोर

वेगवेगळ्या जिल्ह्यातून चक्क 20 दुचाकीची चोरी; एका चोरीच्या तपासात लाखोंच्या मुद्देमालासह मोठी टोळी जेरबंद  

Yavatmal Crime News : एका चोरीच्या तपासात वेगवेगळ्या जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्यांची विक्री यवतमाळ मध्ये करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal News) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुचाकीची चोरी होत असल्या घटना घडत होत्या. त्या अनुषंगाने पोलि‍सांकडे होत असलेल्या चोरीच्या तक्रारीमध्ये देखील वाढ झाली होती. परिणामी, पोलिसांनी या दुचाकी चोरांना जेरबंद करण्याच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवली होती. दरम्यान एका चोरीच्या (Crime) तपासात पोलिसांना वेगवेगळ्या जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्यांची विक्री यवतमाळ मध्ये  करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी चक्क 20 दुचाकीसह लाखोंच्या मुद्देमाल जप्त केला आहे. तर या टोळीकडून आणखी काही चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केला असून त्या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहेत.  

चोरलेल्या 20 दुचाकीसह लाखोंच्या मुद्देमाल जप्त 

राज्यातील नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, येथील दुचाकी चोरून यवतमाळ येथे विक्री करनाऱ्या टोळीला यवतमाळच्या लालखेड पोलिसांनी अटक केलीय. या कारवाई मध्ये त्याच्याजवळून 10 लाख रुपये किमतीच्या 20 चोरलेल्या दुचाकीसह जप्त करण्यात आल्याय. लखन देवीदास राठोड, (रा. मोरगव्हाण ह.मु. सुलतानपूर, जि. बुलडाणा) वैभव घुले (रा. सुलतानपूर), बादल राठोड, शुभम राठोड अशी अटक करण्यात आलेल्यांची 4 संशयित आरोपींची नावे आहेत. 4 जुलैला लालखेड येथून दुचाकी क्रमांक एमएच-32-आर-1126 चोरी गेली होती. या प्रकरणी लाडखेड पोलीस तपास करताना हा आंतरजिल्हास्तरीय चोरी करणारी अट्टल चोरट्यांची टोळी हाती लागली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्याच्याजवळून पुन्हा काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

चोरीच्या तब्बल 23 दुचाकीसह अखेर 'त्या' टोळीचा पर्दाफाश

वर्ध्याच्या आर्वी पोलिसांनीही अशीच एक कारवाई करत  तब्बल 23 दुचाकीसह चोरी करणारी एक टोळी जेरबंद केली होती. यात आर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दुचाकी चोरीच्या घटनेचा तपास आर्वी पोलिसांकडून सुरु होता. अशातच धानोडी येथे चोरीची दुचाकी विक्रीकरिता एक युवक येत असल्याची माहिती आर्वी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकला मिळाली. यावरून पोलिसांनी सपाळा रचत नयन मिलिंद गायकवाड (वय 19 वर्ष रा. कोसूर्ला) याला दुचाकीसह अटक केलीय.

संशयित आरोपीला अटक करत तपास केला असता संशयित आरोपीने वर्धा जिल्ह्याच्या आर्वी, सेवाग्राम, सावंगी, अल्लीपूर, खरागणा, सेलू येथील दुचाकी चोरल्याची कबुली दिलीय. दुचाकी चोरताना संशयित आरोपी नयन सोबत वर्ध्याच्या येसंबा येथील साहिल डोंगरे आणि दोन विधीसंघर्षित बालक मदत करत होते. हे सर्व दुचाकी चोरून वाशिम येथे जाऊन विक्री करत असल्याच समोर आलंय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Aandolak On Laxman Hake : पुण्यात मराठा आंदोलकांनी हाकेंना घेरलं, मद्यप्राशन केल्याचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBaramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्याZero Hour Israel vs lebanon : लेबनॉनवर इस्त्रायलचे हल्ले; हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्लाचा खात्मा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
Embed widget