एक्स्प्लोर

Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...

Sanjay Raut on Raj Thackeray : आमची सत्ता आली तर  48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु तसेच रस्त्यावर नमाज पडणे देखील बंद करु, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.

मुंबई : धर्म कोणताही असो तो घराच्या चार भिंतीआड पाहिजे, तो रस्त्यावर येता कामा नये. आमची सत्ता आली तर  48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु तसेच रस्त्यावर नमाज पडणे देखील बंद करु, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घाटकोपरमधील प्रचार सभेत केले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. 

संजय राऊत म्हणाले की, हा भोंगा आम्ही गेले 20-25 वर्ष ऐकत आहोत. त्यासाठी सत्तेची गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोदी आणि शाह यांच्याबरोबर आहात, म्हणजे सत्तेबरोबर आहात. तुम्ही फडणवीस यांच्यासोबत आहात, म्हणजे सत्तेसोबत आहात. तुमच्या हातात सत्ता येईल की येणार नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असतो त्यासाठी सत्तेची गरज नसते. शिवसेनेने गेली 50-55 वर्ष कोणत्याही सत्तेशिवाय अनेकदा आपले अनेक कार्यक्रम राबवले, असे त्यांनी म्हटले.  

सर्वात आधी मोदी-शाह यांना साफ करा

राज ठाकरेंनी मुंबईतील परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित करत सत्ता आली तर मुंबई 24 तासात साफ करू, असे म्हटले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, कशी साफ करणार? बोलायला सोपं असतं, महाराष्ट्राची राजधानी आहे. सर्वात आधी मोदी-शाह यांना साफ करा, तेच परप्रांतीय आहेत. सर्वात आधी मोदी, शाह, अदानी यांना साफ करा, या परप्रांतीयांनी मुंबई नासवली आहे. मुंबई आमच्या हातातून काढून घेण्याचं षडयंत्र त्यांनी रचलेले आहे. मात्र, दुर्दैवाने राज ठाकरे मोदी, शाह, अडणींना मदत करतात, असे त्यांनी म्हटले आहे. 

नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे? 

हा देश सगळ्यांचा असल्याचं सांगितलं जातंय. पण काही कायदेही आहेत. जर एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात यायचं असेल तर पहिल्यांदा पोलिसांना त्याची माहिती द्यायची असते. मुंबईच्या पोलिसांवर माझा 100 टक्के विश्वास आहे. संपूर्ण सत्ता माझ्या हातात दिला तर पोलिसांना 48 तास देईन. ही मुंबई साफ करा असं सांगेन. लोकसभेच्या निवडणुकीवेळी मौलवींनी फतवे काढले होते. मौलावी जर फतवे काढत असेल तर मीही आज फतवा काढतो. माझ्या ⁠सर्व उमेदवारांना मदत करा. ⁠पहिल्या 48 तासांत सर्व मशिदींवरील भोंगे खाली उतरवतो. ⁠जास्त अंगावर याल तर या खाकी वर्दीला रझा अकादमीचा बदला घ्यायला सागंण्याचा आदेश देईन, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. 

आणखी वाचा 

Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत

महत्त्वाच्या बातम्या

Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Embed widget