Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल.
बीड: श्रीराम तीर्थक्षेत्र आयोध्याचे कोषाध्यक्ष श्री गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात शिवचैतन्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी यात्रा बीड (Beed News) त्याच्या अंबाजोगाईत दाखल झाली. यावेळी त्यांनी 100% मतदान हिंदूंनी करणे आवश्यक आहे. हिंदू समाजात (Hindu) मतदानाबद्दल अत्यंत मोठी उदासीनता दिसून येत असल्याची खंत गोविंद देवगिरी (Govind Dev Giri) महाराजांनी बोलून दाखवली.
हिंदूंचे मतदान 50% च्या आसपासच होते. ही खरोखर राष्ट्रीय प्रकारची राष्ट्रीय आपत्ती आहे. मतदान केवळ अधिकार नाही आपले पवित्र कर्तव्य आहे. तसेच भारतापुढे उभ्या असलेल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे सामर्थ्य एका शिवाजी महाराजांच्या चरित्रात कार्यात आणि त्यांच्या प्रेरणेत आहे. हीच प्रेरणा सगळ्या समाजात जागृत व्हावी आणि आपले राष्ट्र समर्थ बनावे त्यासाठी ही शिव चैतन्य जागरण यात्रा काढण्यात आली आहे, असे गोविंददेव गिरिजी महाराज म्हणाले.
परळी विधानसभा मतदारसंघात होम व्होटिंग मतदान प्रक्रियेला सुरुवात
बीडच्या परळी विधानसभा मतदार संघासाठी होम वोटिंग प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. निवडणूक विभागासह तहसील प्रशासन यासाठी सज्ज झाले आहे. दोन दिवस परळी मतदारसंघात ज्या मतदारांना घराबाहेर पडणं शक्य होत नाही. त्यांच्याकरिता होम व्होटिंगची प्रक्रिया राबवली जात आहे.
परळी मतदारसंघात वयोवृद्ध 223 आणि दिव्यांग 13 मतदार आहेत. यांना घराबाहेर पडणं शक्य नाही. त्यामुळे या मतदारांकरिता होम वोटिंगची तयारी प्रशासनाने पूर्ण केलीय. यासाठी 14 टीम तयार असून एका टीम मध्ये नऊ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवस ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. परळी विधानसभेमधील 58 गावांमध्ये होमवोटिंग असून यासाठी निवडणूक कर्मचारी पोलीस प्रशासन तसेच याचे चित्रीकरण केले जाणार आहे.
बीड जिल्ह्यातील 96 संवेदनशील मतदान केंद्रावर असणार करडी नजर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 50 टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंग केली जाणार असून लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे मोठ्या प्रमाणात मतदान झाले त्यापेक्षा विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले होते.
जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन देखील विधानसभा निवडणुकीसाठी अलर्ट असून संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांची विशेष करडी नजर असणार आहे. जिल्ह्यात 96 मतदान केंद्र संवेदनशील असून त्यामध्ये गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी येथील मतदान केंद्राचा समावेश आहे. आणि याच मतदान केंद्रावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाची नजर असणार असेल.
आणखी वाचा
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत