राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
विवाहित असूनही त्याचे 400 महिलांशी संबंध असल्याचा व्हिडीओ उघडकीस आले आहेत. वडील बाल्टसार एनगोंगा अडजो हे स्वतः सेंट्रल आफ्रिकन इकॉनॉमिक अँड मॉनेटरी कम्युनिटी कमिशनचे अध्यक्ष आहेत.
Equatorial Guinea Scandal : मध्य आफ्रिकन देश इक्वेटोरियल गिनी येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिथे Ebang Engoga नावाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याचे सुमारे 400 व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एबांगने ज्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत त्यापैकी अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या पत्नी आहेत. याशिवाय या व्यक्तीचे राष्ट्रपतींची बहीण, पोलीस महासंचालकांची पत्नी आणि 20 हून अधिक मंत्र्यांच्या पत्नींशी शारिरीक संबंध ठेवले आहेत.
अशी घृणास्पद कृत्ये देशाच्या आचारसंहिता आणि नैतिक कायद्याचे थेट उल्लंघन
Ebang Ngoga हा इक्वेटोरियल गिनीमधील नॅशनल फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (ANIF) चे संचालक आहे. त्याच्याशी संबंधित प्रकरण उघडकीस येताच सरकारला धक्का बसला. देशाचे उपराष्ट्रपती टिओडोरो न्ग्युमा ओबियांग मंग्यू यांनी सोमवारी (4 नोव्हेंबर) घोषणा केली की ते त्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करतील ज्यांच्या पत्नी एबांग न्गोगाशी संबंध आहेत. अशी घृणास्पद कृत्ये देशाच्या आचारसंहिता आणि नैतिक कायद्याचे थेट उल्लंघन आहे, असे ते म्हणाले.
Ebang Engoga शी संबंधित व्हिडिओ कुठे व्हायरल झाला?
Ebang Engoga शी संबंधित व्हिडिओ प्रथम व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल झाला. यानंतर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिक-टॉक सारख्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हळूहळू ते वेगाने पसरले. यानंतर, स्थानिक सरकारने दूरसंचार मंत्रालय, नियामक आणि टेलिफोन कंपन्यांना असे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होण्यापासून रोखण्याचे आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून 24 तासांच्या आत सर्व व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले.
Ebang Engoga चे वैयक्तिक आयुष्य
Ebang Ngoga इक्वेटोरियल गिनीमधील नॅशनल फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (ANIF) चे संचालक आहे. लोक त्याला बेलो म्हणून ओळखतात. विवाहित असूनही त्याचे 400 महिलांशी संबंध असल्याचा व्हिडीओ उघडकीस आले आहेत. वडील बाल्टसार एनगोंगा अडजो हे स्वतः सेंट्रल आफ्रिकन इकॉनॉमिक अँड मॉनेटरी कम्युनिटी कमिशनचे अध्यक्ष आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या