KYC Fraud SBI Share Tweet : KYC अपडेट करण्यासाठी मेसेज येतात? असू शकतो फ्रॉड ; SBI ची माहिती
SBI बँकनं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून KYC अपडेट फ्रॉडबाबत माहिती दिली आहे.
KYC Fraud SBI Share Tweet : KYC अपडेट करण्यासाठी अनेकांना मेसेज येत असतात. KYC अपडेट फ्रॉडची संख्या सध्या वाढत आहे. याबाबत SBI बँकनं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
SBIनं शेअर केलं ट्वीट
एसबीयानं ट्वीटमध्ये लिहिले, 'KYCFraud बद्दलची माहिती देशातील अनेक लोकांपर्यंत पोहचली आहे. पण या फ्रॉडचे प्रमाण वाढत आहे. या फ्रॉडमध्ये एखाद्या व्यक्तीला खोट्या बँकची लिंक किंवा कंपनीची लिंक एसएमएसद्वारे पाठवून एका लिंकवर क्लिक करून त्यांचे KYC अपडेट करण्यास सांगण्यात येते.' तसेच या स्कॅम संदर्भात तक्रार करण्यासाठी सरकारच्या राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल वेबसाइटची (National Cyber Crime Reporting Portal) लिंक देखील SBIनं या ट्वीटमध्ये शेअर केली आहे.
एसबीयानं एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये असे लिहिलेले दिसत आहे की, 'KYC फ्रॉड हे सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. कोणत्याही अनोळखी नंबरवरून एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये तुमचे KYC अपडेट करा असे लिहिलेलं असते. केवळ SBIच्या नाही तर इतर बँकच्या ग्राहकांना देखील हा मेसेज येऊ शकतो.'
या गोष्टींपासून राहा सावध
मेसेजमध्ये किंवा मेलमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
मेसेजमध्ये सांगण्यात आलेले कोणतेही अॅप फोनमध्ये डाऊनलोड करू नका.
आधार कार्ड नंबर, जन्म तारिख, डेबिट कार्ड नंबर, पिन, CVV, ओटीपी, बँक यूझर आयडी पासवर्ड इत्यादी माहिती कोणालाही देऊ नका.
The reality of #KYCFraud has proliferated across the country. The target is sent a text message asking to update their KYC by clicking on a link by someone acting as a bank/company representative.
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 10, 2021
Report such scams at https://t.co/3Dh42ifaDJ#StateBankOfIndia #CyberCrimeAlert pic.twitter.com/cRydhDQ39H
बँक ही कधीच KYC अपडेट करण्यासाठी अशा प्रकारची लिंक कधीही पाठवत नाही. त्यामुळे या मेसेजमध्ये कोणतीही माहिती भरू नका.
संबंधित बातम्या:
- सावधान...! स्मार्टफोनमध्ये अॅप्लिकेशन डाउनलोड करताय? सोलापुरात महिलेच्या मोबाईलमधील डेटा चोरीला, भयानक अनुभव
- Cyber Fraud: सावधान! बनावट सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यास तुमच्या बँक खात्यातील पैसे लंपास होण्याची शक्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha