एक्स्प्लोर

Cyber Fraud: सावधान! बनावट सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यास तुमच्या बँक खात्यातील पैसे लंपास होण्याची शक्यता

Cyber Fraud:लॉटरी सारख्या गोष्टींचे आमिष दाखवून बँक खात्यातून पैसे लंपास करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. यासाठीमालवेअर सारख्या बोगस सॉफ्टवेअरचा वापर केला जातोय.

Cyber Fraud Through Software: भारतासह संपूर्ण जगात डिजिटलायझेशनची वाढ झपाट्याने होत आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर अवलंबून राहतात. बँकेच्या कामापासून ते खरेदीपर्यंत सर्व कामे आता ऑनलाइन पद्धतीने केली जात आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून सायबर फसवणुकीच्या प्रकारात वाढ होताना दिसत आहे. आजकाल ऑनलाइन बनावट सॉफ्टवेअर आणि अॅप्स सहजरित्या प्ले स्टोअरवर मिळतात. ती डाऊनलोड करताना आपण नकळतपणे सगळ्या माहितीचे अॅक्सेस देतो. त्यामुळे आपल्या माहितीची चोरी होती आणि बँक खात्यातील सर्व रक्कम लंपास होण्याची शक्यता असते.

अशा बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लॉटरी सारख्या गोष्टींचे आमिष दाखवून बँक खात्यातील रक्कम स्वत:च्या बँक खात्यात वळती केली जाते. असेच एक बोगस सॉफ्टवेअर म्हणजे मालवेअर. मालवेअरच्या मदतीने सायबर गुन्हेगार यूजरच्या सिस्टीममध्ये प्रवेश करून सर्व माहिती मिळवतात आणि नंतर त्याचा गैरवापर करतात.

मालवेअर म्हणजे काय?
मालवेअर हे एक असे सॉफ्टवेअर आहे ज्याच्या मदतीने सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये प्रवेश करतात, मोबाईलमध्ये साठवलेली माहिती चोरतात. मालवेअरचे अनेक प्रकार आहेत. तुमचा क्रेडिट कार्ड क्रमांक, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती घेऊन ते त्याचा गैरवापर करतात. यासोबतच काही मालवेअर तुमच्या कॉम्प्युटरमधील फाईल्स आणि चोरु शकतात.

काय करावे 
या अशा मालवेअरपासून सुरक्षा मिळवण्यासाठी संगणकावर फायरवॉल स्थापित करणे आवश्यक आहे. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमधील अँटिव्हायरस आणि स्पायवेअर शोधण्याचे सॉफ्टवेअर काही दिवसांच्या अंतराने अपडेट करत राहणे आवश्यक आहे. लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये कोणतेही अ‍ॅपलीकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी, तुम्ही काय डाउनलोड करत आहात ते एकदा तपासा.

कोणत्याही सोशल मीडिया साईटवर विनंती केलेली माहिती जसे की पासवर्ड, कार्ड तपशील, बँक माहीती इत्यादी कधीही भरू नका. काम पूर्ण झाल्यानंतर, नेट बँकिंगचे लॉगआउट करा. केवळ प्रसिद्ध आणि नामांकित वेबसाईटवरूनच ऑनलाइन खरेदी करा. अनोळखी संदेश, ईमेलद्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. लक्षात ठेवा की त्यावर क्लिक केल्याने तुमच्या खात्याची माहिती चोरी होऊ शकते.

संबंधित बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget