सावधान...! स्मार्टफोनमध्ये अॅप्लिकेशन डाउनलोड करताय? सोलापुरात महिलेच्या मोबाईलमधील डेटा चोरीला, भयानक अनुभव
मोबाईलमध्ये अनसिक्युअर अॅप (Mobile App)डाऊनलोड केल्यामुळे धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. स्मार्टफोनमधील संपूर्ण डेटा, फोटो, मोबाईल नंबर चोरी करण्यात आल्याचा प्रकार सोलापुरात (Solapur News update) घडला
![सावधान...! स्मार्टफोनमध्ये अॅप्लिकेशन डाउनलोड करताय? सोलापुरात महिलेच्या मोबाईलमधील डेटा चोरीला, भयानक अनुभव Cyber Crime Download application in smartphone Data theft from a woman's mobile in Solapur, horrible experience सावधान...! स्मार्टफोनमध्ये अॅप्लिकेशन डाउनलोड करताय? सोलापुरात महिलेच्या मोबाईलमधील डेटा चोरीला, भयानक अनुभव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/16/1b95394a7ea8e30c2b319fc5140c39ab_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : स्मार्टफोनचा (Smart Phones) वापर करताना आपण सहज अनेक अॅप्लिकेशन डाउनलोड करतो. मात्र तुम्ही जर मोबाईलमध्ये अनसिक्युअर अॅप्लिकेशन डाऊनलोड करत असाल तर थोडं थांबा आणि ही बातमी बघा. मोबाईलमध्ये अनसिक्युअर अॅप (Mobile App)डाऊनलोड केल्यामुळे धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. स्मार्टफोनमधील संपूर्ण डेटा, फोटो, मोबाईल नंबर चोरी करण्यात आल्याचा प्रकार सोलापुरात (Solapur News update) घडला आहे.
फोटोखाली अश्लील संदेश लिहून त्यांच्याच नातेवाईंकाना पाठवले
मुळ सोलापुरातील असलेल्या एका महिलेला काही दिवसांपासून अनोळखी नंबर वरुन फोन येत आहेत. 'तुम्ही आमच्याकडून 8 लाखांचे लोन घेतले असून तात्काळ पैसे परत करा अन्यथा तुमची बदनामी करु' अशी धमकी या महिलेला दिली जातेय. दररोज कित्येक अनोळखी फोन या महिलेस येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पैसे देण्यास नकार दिल्याने महिलेच्या मोबाईलमधून चोरण्यात आलेल्या फोटोखाली अश्लील संदेश लिहून त्यांच्याच नातेवाईंकाना पाठवले जात आहेत.
पीडित महिला या पुण्यात खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी करत होत्या. त्यामुळे त्यांनी पुण्यातील सायबर पोलिसांची(Pune cyber police) संपर्क केला. मात्र केवळ फोन बंद करा असा सल्ला देऊन पोलिसांनी तक्रारी अर्ज देखील स्विकारला नसल्याचा आरोप पीडित महिलेचा आहे. फोन बंद केला तरी महिलेच्या नातेवाईंकांना फोन करुन अनोळखी नंबर वरून त्रास दिले जात असल्याचा आरोप महिलेचा आहे. या सगळ्या प्रकारातून त्रस्त झालेल्या महिलेला स्वत:ची नोकरी देखील सोडून द्यावी लागली आहे.
सोलापुरात मागील काही दिवसापासून असे अनेक प्रकार समोर
'सोलापुरात मागील काही दिवसापासून असे अनेक प्रकार समोर येत आहेत. या आधी व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून नंतर ब्लॅकमेल करून पैसे उकळले जात होते. आता मात्र मोबाईलचा संपूर्ण डेटा चोरीला जात आहे. काही सेकंदात लोन देणारे app इंटरनेटवर उपलब्ध आहेत. या माध्यमातून लोन घेऊन लोनची परतफेड केली तरी त्रास देणे सुरूच राहत आहे. डेटा चोरून अनेकांना ब्लॅकमेल केले जात आहे. बदनामीच्या भीतीने अनेक जण तक्रार द्यायला देखील घाबरतात. जर द्यायला कोणी तयार झाला तर पोलीस दखल घेत नाहीयेत.' अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राज सलगर यांनी दिली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
दरम्यान या सगळ्या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आम्ही याची माहिती तात्काळ सोलापूर पोलिसांनी दिली. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतलीय. 'तक्रारदार महिलेने सोलापूर सायबर पोलिसांशी संपर्क केलेला नव्हता. सोलापूर पोलिस या प्रकरणाची तात्काळ दखल घेत आहे. संबंधित महिलेची तक्रार नोंद करुन घेतली. त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी माहिती सायबर पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक शौकत सय्यद यांनी दिली. तसेच सोलापूरच्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची देखील नोंद करण्यात आलीय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)