अंबरनाथमध्ये भरदिवसा ज्वेलर्स दुकानावर दरोडा, हल्लेखोरांच्या गोळीबारात 3 जखमी
अंबरनाथमध्ये भरदिवसा ज्वेलर्स दुकानावर दरोडा घातल्याची घटना घडली आहे. यावेळी हल्लेखोरांनी 25 तोळे सोने लंपास केले आहे.
कल्याण : अंबरनाथ मधील सर्वोदय नगर परिसरातील भवानी ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घालत प्रतिकार करणाऱ्या तिघावर गोळीबार व चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरोड्याचा उद्देशाने आलेल्या चार हल्लेखोरासमवेत दुकानाच्या मालकासह दोघाची झटापट झाली. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार करत चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही जखमी झालेत. दरम्यान या दरोडेखोरांनी सुमारे 25 तोळे सोने लंपास करत तेथून पळ काढला.
आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेले चार हल्लेखोर दुकानात शिरले आणि त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवून दुकानातील मुद्देमाल लुटला. त्यानंतर चारही जण मुद्देमाल घेऊन दुकाना बाहेर पडत असताना दुकानाचे मालक बलीत सिंग, लक्ष्मण सिंग तिथे आले आणि त्यांनी या हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकानाचा कर्मचारी भैरव सिंग हा देखील आला. या सर्वांमध्ये झटापट झाली. यावेळी हल्लेखोरांनी आपल्याजवळील बंदूकीतून या तिघांवर पाच ते सहा राऊंड फायर केले. तसेच चाकूने हल्ला केला. यात तिघेजण जखमी झाले असून त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चाकूचा धाक दाखवत 13 वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार; आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश
या हल्ल्यानंतर दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथक विविध ठिकाणी रवाना केली आहेत. दिवसाढवळ्या भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पाच पथक तयार करत ठिकठिकाणी नाकाबंदी लावून आरोपीचा शोध घेत असल्याचं डीसीपी प्रशांत मोहिते यांनी सांगितलं आहे.
Nashik Crime News | नाशिकमधील भरवस फाट्याजवळ दरोडा टाकत वृद्धाची हत्या,हल्ल्यामध्ये पत्नी गंभीर जखमी