चाकूचा धाक दाखवत 13 वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार; आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश
नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
![चाकूचा धाक दाखवत 13 वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार; आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश Nashik 13 year old girl was gang raped in fear of being stabbed चाकूचा धाक दाखवत 13 वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार; आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/10194351/Nashik-Shivajinagar-police-sation.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. देशात सध्या उत्तर प्रदेशातील बदायूं बलात्कार प्रकरण चर्चेत आहे. अशातच नाशिकमधील एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. चाकूचा धाक दाखवत मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश आहे. तसेच बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. घडलेल्या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.
पीडित मुलीच्या आईने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी तिच्या घरात होती. त्यावेळी तिच्या परिचयातील एक मुलगी तिला तिच्या घरी घेऊन गेली. तिथे गेल्यावर आरोपींनी तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर भयभीत झालेल्या मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आईने मुलीसोबत झालेल्या अत्याचाराविरोधात नाशिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. धक्कादायक बाब म्हणजे, सात आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश आहेत. तर उरलेल्या सहा आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, नाशिकरोड पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर नाशिकरोड पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसेच याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे. चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याची तक्रारीत नोंद करण्यात आली आहे. 7 आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलं आणि एका मुलीचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)