एक्स्प्लोर

UP Ballia Crime: विवाहित प्रेयसीचे अश्लील फोटो, ब्लॅकमेलिंग अन् प्रियकराचा हृदयद्रावक अंत; ओळख मिटवण्यासाठी चेहऱ्यावर टॉयलेट क्लीनर ओतलं, पण सत्य समोर आलंच!

UP Ballia Crime News: उत्तर प्रदेशातील बलिया पोलिसांनी एका अंध हत्याकांडाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. पोलिसांनी एका महिलेसह तीन संशयितांना अटक केली आहे.

UP Ballia Crime News: उत्तर प्रदेशातील बलिया पोलिसांनी एका अंध हत्याकांडाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. पोलिसांनी एका महिलेसह तीन संशयितांना अटक केली आहे. तर यातील एका महिलेसह इतर दोघे फरार आहेत असून पोलीस त्यांचा शोध घेण्यासाठी छापे टाकत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास रसरा पोलीस स्टेशन परिसरातील चिलखर-नठ्ठोपूर लोहटा रस्त्यालगत असलेल्या लोहटा गावात एका झुडुपात एक मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्वाट/सर्व्हेलन्स आणि रसरा पोलीस स्टेशनचे संयुक्त पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृतदेहाची ओळख पटवण्यात आणि घटनेचा उलगडा करण्यात गुंतले होते. दरम्यान, लोहटा गावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्या तरुणाचा चेहरा अ‍ॅसिडने इतका जळाला होता की त्याची ओळख पटवणे कठीण झाले होते. अशातच, आता या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केलाय.

UP ballia Crime News: अश्लील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात प्रेम, अंधविश्वास आणि ब्लॅकमेलिंगची एक भयानक कहाणी समोर आली आहे. 10 फेब्रुवारी रोजी रासरा पोलिस स्टेशन हद्दीतील लोहटा गावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अशातच तपासाअंती पोलिसांनी मृतकाची ओळख पटवली असून मृतक हा पंकज गुप्ता असल्याचे उघड झाले आहे. जो आजमगढचा रहिवासी होता. तसेच त्याचे जवळच्या गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंधात होते. लग्न झाल्यानंतर महिलेला हे नाते संपवायचे होते, परंतु पंकजने तिला अश्लील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. मानसिक दबाव आणि बदनामीच्या भीतीने त्रस्त झालेल्या महिलेने तिच्या भावाला आणि मेव्हण्याला ही गोष्ट सांगितली.

दरम्यान, संतप्त भाऊ आणि मेव्हण्याने पंकजच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी 5 फेब्रुवारी रोजी एका लग्नात हत्येचा कट रचण्यात आला. त्यानंतर कुटुंबाने एकत्र येऊन कट रचला आणि 7 फेब्रुवारी रोजी पंकजचा बोलावून गळा दाबून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या प्रेयसीसह तीन आरोपींना अटक केली आहे, तर इतर दोघांचा शोध सध्या सुरू आहे.

UP Police : पोलिसांनी मृताचा मोबाईल फोन केला.जप्त

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, या घटनेत सहभागी असलेले विजय पाल, मनीष (विजय पालचा मेहुणा) आणि विजय पालची पत्नी या तिन्ही जणांना अटक करण्यात आली आहे. किंबहुना, या घटनेत सहभागी असलेले अरुण सोनी आणि त्यांची पत्नी यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपींच्या माहितीवरून मृताचा मोबाईल फोन आणि घटनेत वापरलेली बाईक जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

UP Crime : ओळख लपवण्यासाठी शरीरावर ओतण्यात आले टॉयलेट क्लीनर

पोलिसांनी असेही म्हटले आहे की, आरोपीने ओळख लपवण्यासाठी शरीरावर टॉयलेट क्लीनर ओतला. पीडितेला चाकूने कापण्यात आले आणि दोरीने गळा दाबून खून करण्यात आला. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं
निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं
Sangli crime IND vs NZ Final T 20 World Cup: भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट, नाचण्यासाठी फायरब्रिगेडची गाडी अडवून सायरन वाजवायला लावला, पोलिसांनी काठ्या हातात घेताच...
भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट, नाचण्यासाठी फायरब्रिगेडची गाडी अडवून सायरन वाजवायला लावला, पोलिसांनी काठ्या हातात घेताच...
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'
नाशिकमध्ये माईंड क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. निलेश जेजुरकरांच्या पत्नीने आयुष्य संपवलं, भावाचे गंभीर आरोप, म्हणाला...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget