Pune Shocking: पैशांसाठी मुलगा जिवावर उठला! आईची हत्या करून वडिलांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल
Pune Shocking: या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय.
Pune Shocking: पैशांच्या आणि जमीनीच्या वादातून पोटच्या मुलानं आईची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना पुण्यातील (Pune) इंदापूर (Indapur) तालुक्यातील काझड (Kazad) गावात आज घडली. दरम्यान, तरूणानं त्याच्या वडिलांवरही प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात मुलाविरोधात गुन्हा दाखल आला असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत. पैशांसाठी पोटच्या गोळ्यानं आईला संपवल्याची माहिती कळताच परिसरात एकच खळबळ माजलीय.
अमित पांडुरंग नरुटे असं आरोपीचं नाव आहे. आरोपीनं आज एक ते दोन वाजताच्या सुमारास आई आलका पांडुरंग नरूटे (वय, 55) यांची धारदार कोयत्यानं हत्या केली. तसेच वडील पांडुरंग नरुटे यांच्या दोन्ही हाताच्या अंगठ्यास व डाव्या हाताच्या दंडावर वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले. या हल्ल्यात पांडुरंग यांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटून पडला. या घटनेनंतर संपर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडील मागेल तेवढे पैसे देत नाहीत. तसेच जमीनही वाटून देत नसल्यानं आरोपी मुलानं हे धक्कादायक कृत्य केलंय. आरोपीनं आलका यांच्यावर लोखंडी धारदार कोयत्याने तोंडावर, कपाळावर, डाव्या डोळ्यावर, नाकावर वार केल्यानं त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.
अंबरनाथमध्ये अज्ञात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या
अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात डीएमसी कंपनीच्या बाजूला वूलन मिल कंपाऊंड येथील एका अज्ञात तरूणाची हत्या करण्यात आलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. हत्या झालेल्या तरूणाची अद्याप ओळख पटलेली नसून स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत. मृत तरुणाचं वय अंदाजे 25 ते 30 वर्षांचा असून त्याच्याजवळ ओळख पटण्यासारखं काहीही सापडलेलं नाही. तसेच या तरूणाची दोन जणांनी मिळून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांना संशय आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha