Nashik Shocking: बी.ए.एम.एसच्या विद्यार्थिनीची महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या, पोलीस तपास सुरू
Nashik Shocking: ही घटना काल (गुरुवारी, 30 डिसेंबर) दुपारी घडलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय.
Nashik Shocking: बी.ए.एम.एस चे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीनं महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ही घटना काल (गुरुवारी, 30 डिसेंबर) दुपारी घडलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. मृत तरूणीनं नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) पुढील चौकशीला सुरुवात केलीय. घटनास्थळावरून पोलिसांनी मृत तरूणीचा मोबाईल आणि इतर साहित्य हस्तगत केलं आहे. तसेच संबंधित तरूणीनं नैराश्यातून आत्महत्या केली आहे की यामागे दुसरं काही कारण आहे? याचाही पोलीस तपास करीत आहेत.
श्रुती सानप (वय, 22) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नावं आहे. श्रुती ही मूळची बीड जिल्ह्यातील असून ती नाशिक शहरातील श्री सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयात बी.ए.एम.एस च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. सुट्टयांमुळे गावी गेलेली श्रुती दोनच दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या वसतीगृहात परतली होती. मात्र आल्यापासून ति नैराश्यात होती. बुधवारी रात्रिच्या सुमारास श्रुती ही रूमचे दार उघडत नसल्यानं तिच्या मैत्रणीनं वसतीगृहाच्या निरीक्षकांकडे धाव घेतली. त्यानंतर रुमचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी श्रुती ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
या घटनेमुळं सानप कुटुंबासह श्रुतीच्या मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. श्रुतीनं क्लासला ऍडमिशन घेण्यासाठी घरून पैसे आणले होते. मात्र, त्यातील काही पैसे गहाळ झाल्यानं ती नैराश्यात होती अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल आणि ईतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले असून श्रुतीच्या मैत्रिणी, महाविद्यालयाचं प्रशासन आणि कुटुंबाचा जबाब
नोंदवला जातोय, अशी माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी दिलीय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- संतापजनक! नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बाप-लेकीच्या नात्याला काळीमा
- 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या फादरला कठोर जन्मठेपेची शिक्षा
- Viral News : सोने तस्करीसाठी अनोखी शक्कल, दाढी करण्याच्या ट्रीमरमध्ये लपवली बिस्किटे
Before You Go
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
महत्त्वाच्या बातम्या






















