एक्स्प्लोर

Ulhasnagar Crime: ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ

Ulhasnagar Murder News : पतीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकताच तो धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही आत्महत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाल्याचं चित्र आहे.

ठाणे : उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराची भरदिवसा ऑन ड्युटी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महादू जगताप असे मयत सफाई कर्मचाऱ्याचे नाव असून तो उल्हासनगर महापालिकेने ठेका दिलेल्या कोणार्क कंपनीकडे कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करत होता. या घटनेनंतर आणखी एक दुर्दैवी घटना घडली. पतीच्या हत्येची माहिती मिळताच त्यांची पत्नी पूर्वी महादू जगताप यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या दुहेरी घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ऑन ड्युटी असताना हल्ला

महादू जगताप हे आज सकाळी उल्हासनगर कॅम्प 3 मधील सेक्शन 20 परिसरात आनंद आईस्क्रीमजवळ साफसफाईचे काम करत होते. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात महादू जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

सदर हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

भरदिवसा काम करत असताना सफाई कर्मचाऱ्याची हत्या झाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घटनेनंतर महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

जळगावात पोलिसाची आत्महत्या

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव (Jalgaon) तालुक्यातील कोदगाव येथे गळफास घेऊन जीवन संपवलं, या घटनेनं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. निलेश पाटील असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव कोदगाव येथील घरातच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली असून आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पोलिसांच्या तपासाला अधिक गती येईल. तसेच, कुटुंबीय आणि नातेवाईकांकडेही विचारपूस केली जात असल्याची माहिती आहे. 

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget