थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक नियमांची पायमल्ली, तळीरामांना मुंबई पोलिसांचा दणका
Mumbai Police : मुंबई पोलिसांनी थर्टी फर्स्टच्या रात्री निर्बंधांची पायमल्ली करणाऱ्यांवर, वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर आणि तळीरामांवर कारवाई केली आहे.
Mumbai Police : सुमारे दोन वर्षांपासून चालू असलेल्या कोरोना (Coronavirus) च्या सावटातून कुठे सुटल्याचे वाटत होते इतक्या वर्ष सरते शेवटी ओमायक्रॉनने (Omicron Variant) उडी मारली. नवीन वर्षाच्या आगमनाची वाट पाहत असलेल्या प्रत्येकाच्याच आनंदावर निर्बंध लागले. मुंबईसह महाराष्ट्रात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आणि त्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टसाठी कार्यक्रमांचं आयोजन न करणे, नाईट कर्फ्यू तसेच लोकांनी रस्त्यावर गर्दी करू नये कलम 144 लागू करण्यात आले.
सर्व निर्बंध लागू असतानाही थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी अनेक लोक घराबाहेर पडले पाहायला मिळाले. अशातच अनेक तळीरामांकडून वाहन चालवत वाहतूक नियमांची पायमल्लीही करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक नियमांतर्गत कारवाई व्हावी, यासाठी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी नाकाबंदी केली होती. यावेळी मुंबईत पोलिसांकडून निर्बंधांची पायमल्ली करणाऱ्यांवर आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, शुक्रवारी म्हणजेच थर्टी फर्स्टच्या रात्री अनेक वाहने रस्त्यावर होती आणि प्रत्येकाला नाकाबंदीतून जावे लागले. यावेळी तपासादरम्यान पोलिसांनी 18 जणांविरुद्ध दारु पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी (Drink And Drive) रॅश ड्रायव्हिंगचे (Rash Driving) गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या 408 जणांवर, ट्रिपल सीट बाईक चालवल्याप्रकरणी 16 जणांवर, तर मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 हजार 375 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर वाहने चालवून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर त्यांनी केलेल्या कारवाईची दिलेली आकडेवारी 31 डिसेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Testing : कोरोना चाचणीसाठी 24 तास बूथ उभारा, केंद्राचे राज्यांना आदेश
- आजपासून तुमच्या आयुष्यात होणाऱ्या 'या' बदलांसाठी तयार राहा
- Happy Birthday Vidya Balan : 'हम पाँच'पासून 'शेरनी'पर्यंतच्या संघर्षाची 'कहानी'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha