Nashik Crime : भावकीचा वाद बेतला जीवावर, नाशिकमध्ये दोन गटात जोरदार राडा, कारखाली चिरडून तरुणाचा काढला काटा
Nashik Crime : जुन्या भांडणाची कुरापत आणि भावकीच्या वादातून दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना नाशिकच्या सिन्नर तालुक्यात घडली आहे.

Nashik Crime : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात (Sinnar Taluka) शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. मयताच्या अंगावर कार घालून त्याला चिरडण्यात आल्याची चर्चा आता सिन्नरमध्ये रंगली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दातली (Datli) या गावात शुक्रवारी जुन्या भांडणाची कुरापत आणि भावकीच्या वादातून दोन गटात जोरदार राडा झाला. दोन्ही गटाने एकमेकांवर हल्ला करण्यासाठी कोयता आणि कुऱ्हाडी या धारदार शस्त्रांनी वापर केला. या हल्ल्यात सागर मारूती भाबड याचा मृत्यू झालाय. त्याला सुरुवातीला गाडीनं चिरडलं नंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची चर्चा सध्या सिन्नरमध्ये रंगली आहे. तर या घटनेत जगन्नाथ नरहरी भाबड (50), अक्षय म्हाळू भाबड (28), म्हाळू नरहरी भाबड (53), सुयोग म्हाळु भाबड (22) सर्व रा. दातली, ता. सिन्नर आणि ओमकार विजय डोमाडे (21, रा. देशवंडी, ता. सिन्नर) असे पाच जण जखमी झाले आहेत. सागरसह या पाचही जणांना उपचारासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सागर याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर उर्वरित जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वीच वडिलांची आत्महत्या
या घटनेत गंभीर जखमी झालेले सागरचे चुलत भाऊ आणि चुलते यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत असताना त्यांनी टाहो फोडला. सागरच्या मारेकऱ्यांना अटक होऊन शिक्षा झाली नाही, तर पोलिस ठाण्यासमोरच आत्महत्या करण्याचा इशारा सागरचा चुलत भाऊ आणि चुलत्यांनी दिला तर सागरचे वडील मारुती भाबड यांना मेंढी येथील व्यसनमुक्ती केंद्रात दारू सोडविण्यासाठी ठेवले होते. बुधवारी त्यांनी या केंद्रात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूला दोन दिवस उलटत नाही तोच भाऊबंदकीतून झालेल्या मारहाणीत सागरचा मृत्यू झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

