Navi Mumbai Crime : अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या ला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक
स्पावर खोटेनाटे आरोप करुन कारवाई करण्याची धमकी देऊन आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. एवढंच नाही याचे व्हिडीओ बवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडून वारंवार पैसे उकळले होते
नवी मुंबई : पोलीस असल्याचं भासवून गेल्या तीन वर्षांपासून एका 34 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीला सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित महिला ही एका मसाज पार्लरची मालकीण आहे. आरोपीला नेरुळमधून अटक करण्यात आली. गुरुपाल सिंह अहुजा असं या आरोपीचं नाव आहे.
ही घटना सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संबंधित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी गुरुपाल सिंह अहुजा आणि तिचा परिचय होता. स्पा सेंटरच्या व्यवसायामुळे दोघांची मागील काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपीचं स्पामध्ये जाणं-येणं वाढलं होतं. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने संबंधित आपल्याबरोबर मार्च 2019 पासून शारिरीक संबंध ठेवले. एवढंच नाही तर या प्रकाराचे अश्लील व्हिडीओ देखील बनवले होते.
हे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी तक्रारदार महिलेकडून वेळोवेळी पैसे उकळत होता. त्याचबरोबर तक्रारदार महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तुझ्या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय केला जात असल्याचा सगळ्यांना सांगेन, असं धमकावत होता. आरोपीकडून वाढतच चाललेली पैशाची मागणी आणि मानसिक त्रास याला कंटाळून अखेर या महिलेने शुक्रवारी (20 मे) सानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत सानपाडा पोलिसांनी दोन तासातच आरोपीला अटक केली.
"एका स्पा चालक महिलेकडून गुरुपाल सिंह अहुजा नावाचा इसम खंडणी मागत होता. त्यासोबतच तिच्या स्पावर खोटेनाटे आरोप करुन कारवाई करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध देखील ठेवले होते. संबंधित महिलेच्या तक्रारीवरुन आम्ही कलम 376 2 (अ), 384, 392 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे," अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या