एक्स्प्लोर

Akola Crime: अकोल्यात अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, कोचिंग क्लासेसच्या संचालकाविरुद्ध पॉस्कोचा गुन्हा 

Akola News : अकोला शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला

Akola News : अकोला शहरातील चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी याच्याविरुद्ध रविवारी अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 354 सह पोस्को व आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवून सिव्हिल लाईन्स पोलिसांनी वसीम चौधरी याला अटक केली आहे.

 
अकोला येथील चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसिम चौधरी याच्याविरुद्ध रविवारी सायंकाळी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार वसीम चौधरी याने मुलीसोबत मोबाईलवरून अश्लिल चॅटिंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला अभ्यासाच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यासोबत अश्लिल चाळे केल्याचेही तक्रारीत नमुद आहे. घाबरलेल्या मुलीने ही बाब पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांसोबत थेट सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन गाठून वसीम चौधरी विरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून विनयभंग करणे, पोस्को कलम नऊ एफ, 10 अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणे आणि आयटी ॲक्ट कलम सहा, सात (ब) मोबाईलवर अश्लील चॅटिंग करने आदी गुन्हे दाखल केले आहे. सिव्हील लाईन पोलिसांनी वसीम चौधरीला अटक केली आहे. 

नेमकं काय घडलं :

 20 मे रोजी वसिम चौधरी याने पीडित अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर मेसेज पाठवून महत्वाचं बोलायचं आहे. असे म्हणून तिला क्लासला बोलाविले, त्यानंतर ती वसिम चौधरी यांच्या कोचिंग क्लासला दुपारी 5 वाजता घरून निघाली. अन् क्लासला गेल्यावर चौधरींनी तिला घरात बोलाविले आणि मागील रुममध्ये बसविले. आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अल्पवयीन मुलीने त्याला धक्का देवून बाहेर पळ काढला. अन् विरोध करत आरडाओरड केली. 

आईच्या जागरुकतेनं प्रकार आला उघडकीस : 

वसिम चौधरी हा त्याच्या फोनवरून चॅटिंग करुन, तिला अश्लील ईमोजी पाठवायचा. चौधरीच्या अशा वागण्यामुळे ती खूप तणावात होती. यासोबतच वसिम चौधरीने तिला धमकीही दिली होती की, तू हे जर कोणाला सांगितले तर मी तुझे करिअर बरबाद करेल. त्यामुळे भीतीपोटी घडलेला प्रकार तिने कोणाला सांगितला नाही. कोचिंग क्लासेसला जाणे बंद केले. अन् घरीच ऑनलाईन क्लासेस सुरु केले. आज आईने तिला म्हटले की, ऑफलाईन क्लासेस चालू असतांना तू ऑनलाईन क्लासेस का करतेस, असे म्हणून ट्यूशन क्लासला जाण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर या पीडित मुलीने सर्व घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. अशा प्रकारे झालेल्या घटनेची तक्रार तिने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला दिली आहे. या तक्रारीनंतर चौधरी याच्यावर ३५४(अ)(ड), ५०६, १०, १२ पॉस्कोअंतर्गत गुन्हे दाखल दाखल झाले असून अटक करण्यात आली आहे. 

आरोपीवर कठोर कारवाईची सर्वपक्षीय मागणी : 

या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सिव्हील लाईन पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या वसिम चौधरीवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी तोष्णीवाल लेआऊटमधील चौधरीच्या कोचिंग क्लासला सील करीत तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकालBeed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतलाMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Astrology : महिन्याच्या पहिल्याच दिवशीच अनेक शुभ योगांचा महासंगम; मेषसह 5 राशींना मिळणार अफाट लाभ, महादेवाच्या कृपेने होणार धनवर्षाव
महिन्याच्या पहिल्याच दिवशीच अनेक शुभ योगांचा महासंगम; मेषसह 5 राशींना मिळणार अफाट लाभ, महादेवाच्या कृपेने होणार धनवर्षाव
Embed widget