एक्स्प्लोर

माझा मुलगा राज्यस्तरीय खेळाडू, धिंड काढणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा, साताऱ्यात नातेवाईकांची मागणी

अल्पवयीन मुलांची कथित धिंड काढल्याच्या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.

Satara :  साताऱ्यातील म्हसवड धिंड प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अल्पवयीन मुलांची कथित धिंड काढल्याच्या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी समाजकार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, अल्पवयीन मुलांचा सन्मान धुळीस मिळवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली. 

दीड वर्षापूर्वी केवळ स्टेटअस ठेवला म्हणून त्याला या गुन्ह्यात पोलीसांनी अडकवला

माझा मुलगा अल्पवयीन असून त्याची धिंड काढली आहे. तो खेळाडू आहे. दोन वेळा राज्य पातळीवर निवड झाली आहे. 13 वेळी जिल्हा पातळीवर नंबर आला आहे. असं असताना दीड वर्षापूर्वी केवळ स्टेटअस ठेवला म्हणून त्याला या गुन्ह्यात पोलीसांनी अडकवला असल्याची माहिती पालकांनी दिली आहे. आमच्या मुलाची धिंड काढली गेली. आमचं नाव घालवलं गेलं. समाजात आमची बदनामी झाली. माझ्या मुलाने कुणाचा मुडदा पाडला होता का असा प्रश्न मुलाच्या आईने उपस्थित केला आहे. आता आयुष्यभर ही बदनामी सहन करावी लागणार आहे. त्याची काही चुक नव्हती. त्याच्या विरोधात कधी कोणताही गुन्हा नव्हता असं ही त्याच्या आईने सांगितलं

दरम्यान, या प्रकरणी कारवाई न झाल्यास उद्यापासून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल उद्यापर्यंत मागवून घेतो, असं आश्वासन दिलं आहे. आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतं, आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

 पोलीस अधिक्षकांनी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवून घेण्याचे आश्वासन दिले

म्हसवड येथे काही दिवसापूर्वी पोलीसांनी अल्पवयीन मुलाची धिंड काढली होती. या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी  तक्रारदार आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज साताऱ्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या वेळी पोलीस अधिक्षकांनी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवून घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र या आश्वासनाने कुटुंबीयांचे समाधान झालेले नाही. त्यांनी पोलीसांवर गंभीर आरोप केले आहे. शिवाय पुढच्या काळात आंदोलन करण्याचा इशारा ही दिला आहे. आमच्या मुलाला या प्रकरणात गुंतवल्याचा आरोप ही केला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
नगरसेवकांचे मासिक मानधन 1 लाख रुपये करा, समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेची महापौरांकडे मागणी
नगरसेवकांचे मासिक मानधन 1 लाख रुपये करा, समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेची महापौरांकडे मागणी
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
Embed widget