वडिलांचा सल्ला, मुलाचं कष्ट, 'या' व्यवसायाच्या माध्यमातून बेरोजगारी झाली दूर
एका तरुणाने बेकरी उद्योगाच्या (Bakery industry) माध्यमातून स्वत:ची प्रगती साधली आहे. भारत भूषण असं बिहारमधील बनानिया पंचायतीचे रहिवासी असलेल्या तरुणाचे नाव आहे.

Business News : सध्याच्या काळात अनेक तरुण विविध उद्योग, व्यवसाय करताना दिसत आहेत. नोकरीच्या (Job) मागे न लागत व्यवसाच्या (Business) माध्यमातून चांगला नफा मिळवत आहेत. एका अशाच तरुणाने बेकरी उद्योगाच्या (Bakery industry) माध्यमातून स्वत:ची प्रगती साधली आहे. भारत भूषण असं बिहारमधील बनानिया पंचायतीचे रहिवासी असलेल्या तरुणाचे नाव आहे. पाहुयात त्याची यशोगाथा.
बेकरी उद्योग हा व्यवसाय तुम्हाला लहान वाटेल, पण त्यातून मिळणारं उत्पन्न चांगले आहे. बिहारमधील बनानिया पंचायतीचे रहिवासी उपेंद्र प्रसाद मंडल दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा भारत भूषण पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करूनही बेरोजगार होता. त्याला काम मिळत नव्हते. त्यानंतर उपेंद्र प्रसाद यांनी भारत भूषण यांना बेकरी उद्योग सुरु करण्याची कल्पना देण्यात आली. आज उद्योगातून भारत भूषण चांगला नफा मिळवत आहे.
मुख्यमंत्री उद्यमी योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य
बिरामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारनं 'मुख्यमंत्री उद्यमी योजना' सुरु केली आहे. त्यानंतर उपेंद्र प्रसाद यांनी त्यांचा मुलगा भारत भूषणला बेकरी उद्योग सुरु करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर भारत भूषणने मुख्यमंत्री उद्यमी योजनेअंतर्गत कर्जासाठी फॉर्म भरला. यासाठी त्याची निवड झाल्यानंतर त्याने सप्टेंबर 2022 मध्ये 10 लाखांचे कर्ज घेतले. यामध्ये स्वतःच्या भांडवलाचे 5 लाख रुपये गुंतवून बेकरी उद्योग सुरू केला. झारखंडमधील कारागीर येथे बेकरी बनवतात. या उद्योगाच्या माध्यमातून गावातील 50 तरुणांना थेट रोजगारही उपलब्ध झाला आहे. याशिवाय अन्य 10 तरुणांनाही अप्रत्यक्षरीत्या रोजगार देण्यात आला आहे.
रोज 3000 रुपयांची मिळकत
बेकरी व्यवसाय हा चांगला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून चांगला नफा मिळवला जाऊ शकतो. भारत भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकरी उद्योगातून दररोजचा सुमारे 40 ते 45 हजार रुपयांचा रोजचा व्यवसाय आहे. यामध्ये दररोज तीन हजार रुपये निव्वळ नफा होतो. त्यानुसार महिनाभरात 90 हजार रुपयांचा निव्वळ नफा होत असल्याची माहिती भारत भूषण यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
यूट्यूबच्या साथीनं शेतकऱ्यानं लावलं पैशाचं झाडं, ओसाड जमिनीत फुलवलं नंदनवन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

