यूट्यूबच्या साथीनं शेतकऱ्यानं लावलं पैशाचं झाडं, ओसाड जमिनीत फुलवलं नंदनवन
अलीकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतीत विविध प्रकारचे प्रयोग करताना दिसत आहे. यातून चांगला नफाही कमावत आहेत.
Mahogany Tree Farming: अलीकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतीत विविध प्रकारचे प्रयोग करताना दिसत आहे. यातून चांगला नफाही कमावत आहेत. पावसाअभावी दुष्काळाच्या समस्येला तोंड देत असलेल्या राजस्थानमधील टंकला गावातील शेतकरी लिहमाराम मेघवाल यांनी नापीक जमिनीवर पैसे देणारे झाड लावले आहे. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून या शेतखऱ्यानं ओसाड जमिनीत पैशाचे झाड लावले आहे.
कोणतेही काम मन लावून केले तर यश नक्कीच मिळते. एका शेतकऱ्यानेही तेच केले. पावसाअभावी दुष्काळाच्या समस्येला तोंड देत असलेल्या राजस्थानमधील टंकला गावातील शेतकरी लिहमाराम मेघवाल यांनी नापीक जमिनीवर पैसे देणारे झाड लावले. हे झाड महोगनीचे झाड आहे. यातून अनेक शेतकरी कोट्यवधी रुपये कमावत आहेत.
महोगनीचे झाड तुम्हाला श्रीमंत करेल
लॉकडाऊनच्या वेळी अनेक लोक आपल्या घरात बेरोजगार बसले होते. त्यानंतर बेरोजगारीच्या काळात मेघवाल यांनी सेंद्रिय शेतीबाबत संशोधन सुरू केले. त्यांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महोगनीचे झाड लावण्याचे ठरले. पण राजस्थानच्या ओसाड भूमीत हे सोपे नव्हते. पण या शेतकऱ्याने यशस्वी प्रयोग केला.
YouTube ने दाखवला मार्ग
मेघवाल यांनी सर्वप्रथम यूट्यूबवरून महोगनी लागवडीची पद्धत शिकून घेतली. यानंतर, त्याची काळजी घेण्यासाठीची सर्व माहिती देखील जाणून घेतली. सर्व संशोधनानंतर त्यांनी आपल्या शेतात 100 महोगनीची झाडे लावली. त्यापैकी 90 झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे. मात्र त्यानंतरही मेघवाल यांनी हार मानली नाही.
त्यांनी कृषी तज्ज्ञांकडून माहिती मिळवली आणि संशोधनाच्या आधारे उरलेल्या दहा झाडांचीच चांगली काळजी घेतली. ती झाडं फक्त तीन वर्षांची आहेत. वास्तविक, महोगनीच्या झाडाची योग्य वाढ होण्यासाठी सुमारे 12 वर्षे लागतात. यानंतरही मेघवाल यांनी त्यांच्या शेतात आणखी झाडे लावली आहेत. .
महोगनीच्या झाडाला पैशाचे झाड का म्हणतात?
रायफल, फर्निचर, बोटी, सजावटीच्या वस्तू, प्लायवूड, शिल्प अशा अनेक महागड्या वस्तू महोगनीच्या झाडापासून बनवल्या जातात. ही लाकडे सहजासहजी खराब होत नाहीत, त्यामुळं त्यांची मागणी आणि किंमत दोन्ही जास्त राहतात. हे झाड लावण्यासाठी जास्त पाणी किंवा जास्त देखभाल करावी लागत नाही. परंतू, याद्वारे भरपूर पैसे कमावता येतात. आजकाल अनेक शेतकरी महोगनी लागवडीतून करोडो रुपये कमावत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: