(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तरुण शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग, 25 हजार रुपयांच्या खर्चातून कमावले 6 लाख रुपये
आज आपण एका प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. या शेतकऱ्यानं हंगामी भाजीपाला लागवडीतून 6 लाखांची कमाई केली आहे.
Success Story: अलीकडच्या काळात शेतकरी (Farmers) आपल्या शेतीत नवनवीन प्रगोग करत आहेत. कमी खर्चात लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत. आज आपण अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. या शेतकऱ्यानं हंगामी भाजीपाला लागवडीतून 6 लाखांची कमाई केली आहे. यासाठी त्याला फक्त 25 हजार रुपयांचा खर्च आला आहे. संजय राजपूत असं उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील शिवगढ शहरातील दहिगनवा गावात राहणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.
फ्लॉवर, कोबी, टोमॅटो आणि बीट रुटची लागवड
संजय हे उन्हाळ्यात काकडीची लागवड करतात. काकडीचा वापर कोशिंबीर आणि रायता बनवण्यासाठी केला जातो. काकडीच्या शेतीतूनही त्यांना चांगला नफा मिळतो. तरुण शेतकरी संजय राजपूत आपल्या शेतात हंगामी भाजीपाल्याची लागवड करतात. त्यामुळं ते घरी बसून कमी खर्चात जास्त नफा कमवत आहेत. या भाज्यांना बाजारात चांगली मागणी असून शेतकऱ्यांना चांगला भाव देखील मिळतो. प्रगतीशील शेतकरी संजय राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या 8 वर्षांपासून हिरव्या भाज्यांची लागवड करत आहेत. 2 एकर क्षेत्रावर ते फ्लॉवर, कोबी, टोमॅटो आणि बीट रुटची लागवड करत असतात. शेतात तयार केलेला भाजीपाला तो रायबरेली, लखनौ आणि बाराबंकी येथील बाजारात विक्रीसाठी पाठवतात. एका एकरासाठी सुमारे 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो आणि खर्चाच्या तुलनेत वर्षाला 5 ते 6 लाख रुपये सहज कमावत असल्याची माहिती संजय यांनी स्वत: दिली.
हंगामी भाजीपाल्याची लागवड
चांगले पीक घेण्यासाठी वनस्पती निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जमिनीत पुरेशा प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असावेत. तसेच, रोपवाटिकेसाठी अशी जागा निवडावी जिथे पाणी साचणार नाही किंवा पूर येत नाही. याशिवाय पिकांचे रोग व किडीपासून संरक्षण करावे. अशी माहिती तरण शेतकरी संजय राजपूत यांनी सांगितली. ते गेल्या 8 वर्षांपासून त्यांच्या 2 एकर जमिनीवर हंगामी भाजीपाल्याची लागवड करत आहेत. त्यामुळं त्यांना कमी खर्चात जास्त नफा मिळत आहे. ज्या भाज्यांना बाजारात जास्त मागणी आहे, अशाच भाज्या ते पिकवतात. त्यामुळं ते चांगल्या दरात सहज विकले जाते.
उन्हाळ्यात काकडीची लागवड
बागायती शेतीमध्ये मधमाशी पालन, मशरूम उत्पादन, फुले व फळांची लागवड यांचा समावेश होतो. वास्तविक प्रत्येक शेतकऱ्याला नफा मिळवायचा असतो. ज्यासाठी तो वर्षभर मेहनत करतो. संजय उन्हाळ्यात काकडीची लागवड करतो. काकडीचा वापर कोशिंबीर आणि रायता बनवण्यासाठी केला जातो. काकडीच्या शेतीतूनही चांगला नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या: