वर्ष 2021 मध्ये क्रिप्टोचा बोलबाला, नव्या वर्षा इथरियम बिटकॉईनला मागे टाकणार?
Crypto Market in 2021 : सरत्या वर्षात क्रिप्टो करन्सीकडे गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा ओढा वाढला आहे.
Crypto currency : क्रिप्टो करन्सी आता गुंतवणुकीसाठी मुख्य प्रवाहातील गुंतवणुकीचा पर्याय, मालमत्ता ठरू शकते. क्रिप्टोचा मार्केट कॅप वाढला असून या वर्षात 3 ट्रिलियन डॉलर इतका झाला आहे. अमेरिकेतील US SEC नेदेखील बिटकॉइन ETF ला मंजुरी दिली आहे. भारतातही क्रिप्टो चलनाचे नियमन करण्यासाठी विधेयक मांडणार आहे.
भारताच्या क्रिप्टो मार्केटमध्ये जुलै 2020 ते जून 2021 पर्यंत तब्बल 641 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यामुळे मध्य आणि दक्षिण आशिया आणि ओशिनिया हा प्रदेश जगातील सर्वात वेगाने वाढणार्या क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बदलण्यात मदत झाली, असे ऑक्टोबरमध्ये प्रकाशित झालेल्या 'चेनॅलिसिस'च्या अहवालात म्हटले आहे.
बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा ओढा वाढत आहे. बिटकॉइनने 10 नोव्हेंबर 2021 आजवरचा सर्वाधिक उच्चांक गाठला होता. बिटकॉइनची किंमत 68 हजार 721 डॉलर इतकी झाली होती. वर्षभरात बिटकॉइनचा दर 120 टक्क्यांनी वधारला आहे. बिटकॉइनचे एकूण बाजार भांडवल 3 ट्रिलीयन डॉलरहून अधिक झाले आहे.
बिटकॉइनला डिजीटल गोल्ड असे म्हटले जाऊ लागले आहे. ही संकल्पना सध्या रुजत आहे. वाढत्या महागाई दराच्या पार्श्वभूमीवर अनेकांकडून बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीस प्राधान्य दिले जात आहे.
क्रिप्टोकरन्सीने यावर्षी खऱ्या अर्थाने टेकऑफ केले असल्याचे CoinDCX चे सीईओ सह-संस्थापक सुमित गुप्ता यांनी सांगितले. या वर्षात क्रिप्टोबाबत अनेक चर्चा झाल्या, अनेकांनी गुंतवणुकीस प्राधान्य दिले असेही त्यांनी म्हटले.
इथरियम
इथरियममध्ये 443 टक्क्यांनी वाढ झाली. DeFi आणि NFTs या प्रतिस्पर्ध्यांनाही इथरियममध्ये मागे टाकले. इथरियम हे सध्या बिटकॉइन इतके प्रसिद्ध नाही. इथरियम ही दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. या करन्सीचे फायदे बिटकॉइनपेक्षा अधिक आहेत. येत्या वर्षात इथरियम हे बिटकॉइनला मागे टाकू शकते. त्यामुळे गुंतवणुकदारांनी याकडे कानाडोळा करता कामा नये असे इंडिया ब्लॉकचेन अलायन्स आणि चेनसेन्स लिमिटेडचे मुख्य अधिकारी राज कपूर यांनी म्हटले.
सरत्या वर्षात NFT मध्ये दमदार वाढ झाली. येत्या वर्षात NFT ला मोठा प्रतिसाद मिळणार असल्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. येत्या वर्षात NFT कडे दुर्लक्ष करता येणार नाही.
क्रिप्टो करन्सीकडे भारतीयांचा ओढा वाढत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. भारतीय महिलांचा क्रिप्टोला स्वीकारण्याकडे कल आहे. जवळपास 15 टक्के महिला गुंतवणुकदार असल्याचे CoinSwitch Kuber ने म्हटले आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे, लखनऊ, पाटणा आदी शहरांमधून क्रिप्टोमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक होत असल्याचे त्यांनी म्हटले.
तरुण गुंतवणुकदारांचा ओढा वाढत असून आमच्याकडे 28 वर्षाखालील 60 टक्के गुंतवणुकदार असल्याचे CoinSwitch Kuber ने म्हटले.