एक्स्प्लोर

महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?

केंद्रस सरकारच्या लखपती दीदी या योजनेची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाते.

 सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत दिली जाणार आहे. अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती. सध्या एकूण सात राज्यांत महिलांना आर्थिक स्वरुपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजनेदेखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे?  या योजनेचे स्वरुप काय आहे? हे जाणून घेऊ या.... 

योजनेचा उद्देश काय? 

केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.  

 पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार मदत

ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे. या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. 

योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय? 

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा? 

लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. 

हेही वाचा :

UPS आणि NPS म्हणजे नेमकं काय? दोन्हीमध्ये नेमका फरक काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेसाठी किती महिला पात्र? आत्तापर्यंत किती अर्ज प्राप्त? सविस्तर माहिती एका क्लिकवर

लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटलं! सर्वांत मोठी अडचण दूर; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैदTop 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp MajhaSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
Embed widget