लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटलं! सर्वांत मोठी अडचण दूर; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने महिलांना येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आता लाखो महिलांना फायदा होणार नाही.
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेसाठी आतापर्यंत साधारण दोन कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. तर आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे. महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत अनेक महिलांना लाडकी बहीण योजनचा लाभ मिळाला असला तरी अनेक महिलांना पैसे मिळालेले नाहीत. वेगवेगळ्या चार्जेस अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेले पैसे संबंधित बँखा कापून घेत आहेत. याच अडचणीची राज्य सरकारने दखल घेतली आहे.
महिलांना नेमकी काय अडचण येत होती?
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये टाकले आहेत. आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. महिलांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे, त्या बँक खात्यावर हे पैसे टाकण्यात आले आहेत. मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकांनी कापून घेतले आहेत. मिनिमिम बॅलेन्स, मिनिमम बॅलेन्स न ठेवल्यामुळे लागणारे चर्जेस तसे इतर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली महिलांना मिळालेल्या 1500 तसेच 3000 रुपयांतील काही रक्कम कापून घेण्यात आली आहे. म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमहिना 1500 रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे टाकले आहेत, पण अनेक महिलांना मात्र ही संपूर्ण रक्कम मिळालीच नाही.
राज्य सरकारने घेतली दखल
याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार केली. तर काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही, असे सांगितले होते. राज्य सरकारने महिलांच्याच याच अडचणींची दखल घेतली आहे. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने बँकांना याबाबत सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये - महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 22, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.
लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही… pic.twitter.com/ASPT5X9V2F
राज्य सरकारने बँकांना काय सूचना दिल्या
राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनांबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या समाजमाध्यम खात्यावरून माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये, अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्याचे कर्ज थकित असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल, तर ते पूर्ववत करण्यात यावे, असेही निर्देश बँकांना दिले आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना राज्य सरकारने दिलेली संपूर्ण रक्कम मिळणार आहे. बँकांकडून कोणतेही शुल्क कापले जाणार नाही.
हेही वाचा :
तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? 'या' तीन गोष्टी समजून घ्या
बँक खात्यावर पैसे न आल्यास लाडक्या बहिणींनी काय करावे? जाणून घ्या महिलांनी तक्रार नेमकी कुठे करावी?