एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेसाठी किती महिला पात्र? आत्तापर्यंत किती अर्ज प्राप्त? सविस्तर माहिती एका क्लिकवर

महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Govt) सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Govt) सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. राज्यातील कोट्यावधी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत.

31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला त्यांना लाभ मिळाला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. 31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 42 हजार 823 अर्जाची पडताळणी सुरु आहे.

सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना मिळणार लाभ

आतापर्यंत कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे 3000 रुपये आले आहेत. 31 जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना हे 3000 रुपये देण्यात आले आहेत. आता 31 जुलैनंतर आलेल्या फॉर्मची छाननी चालू आहे. सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना एकूण तीन महिन्यांचे पैसे दिले जातील. म्हणजेच पात्र महिलांना तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळतील.  

पैसे जमा न झाल्यास कुठे कराल तक्रार?

लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणी येत आहेत. काही महिलांचे अर्ज मंजूर होताना अडचणी येत आहेत. अशा अडचणी येत असतील तर महिलांनी कुठे तक्रार करावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काही अडचणी येत असतील तर त्या नारी शक्तीदूत अॅपवर त्याबाबत तक्रार करू शकतात. यासह महिला स्थानिक अंगणवाडी केंद्रावर जाऊन अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्यांची अडचण सरकारदरबारी मांडू शकतात. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत केली जात आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

बँक खात्यावर पैसे न आल्यास लाडक्या बहिणींनी काय करावे? जाणून घ्या महिलांनी तक्रार नेमकी कुठे करावी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा घुमणार ‘आवाज’; ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवरील मर्यादेला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती
विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा घुमणार ‘आवाज’; ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवरील मर्यादेला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती
Nashik Accident News : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
Yojanadoot : शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करा अन् दरमहा 10 हजार मिळवा, योजनादूतसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी
योजनादूतला तुफान प्रतिसाद, 50 हजार जागांसाठी आतापर्यंत 1 लाख 20 हजार अर्ज, नोंदणी करण्याची शेवटची संधी
Lalbaugcha Raja: 'लालबागचा राजा'च्या मंडपात अभिनेत्रीला बाउंसरकडून धक्काबुक्की, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Video : 'लालबागचा राजा'च्या मंडपात अभिनेत्रीला बाउंसरकडून धक्काबुक्की, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar : Nitesh Rane यांची जीभ घसरली; अजितदादा म्हणतात,वादग्रस्त वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाही100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 September 2024TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 13 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा घुमणार ‘आवाज’; ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवरील मर्यादेला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती
विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा घुमणार ‘आवाज’; ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवरील मर्यादेला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती
Nashik Accident News : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
Yojanadoot : शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करा अन् दरमहा 10 हजार मिळवा, योजनादूतसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी
योजनादूतला तुफान प्रतिसाद, 50 हजार जागांसाठी आतापर्यंत 1 लाख 20 हजार अर्ज, नोंदणी करण्याची शेवटची संधी
Lalbaugcha Raja: 'लालबागचा राजा'च्या मंडपात अभिनेत्रीला बाउंसरकडून धक्काबुक्की, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Video : 'लालबागचा राजा'च्या मंडपात अभिनेत्रीला बाउंसरकडून धक्काबुक्की, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Embed widget