मंदीत संधी! टीसीएसमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका नाही, पगारवाढही मिळणार
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही कंपनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करणार आहे. मंदीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील कंपन्या कर्मचारी कपात करत असताना टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
![मंदीत संधी! टीसीएसमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका नाही, पगारवाढही मिळणार TCS Looks To Hire Impacted Workers Indian Diaspora In US Check Details Here मंदीत संधी! टीसीएसमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका नाही, पगारवाढही मिळणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/41c8f110cd13dd1ad13d0b162d763d571676811570469328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मागील काही दिवसांपासून जगभरात मंदीचं सावट पसरलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. काही कंपन्या करण्याच्या प्रयत्नात आहेत. असं असतानाच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या कंपनीने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. टीसीएस कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून न काढण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर त्यांना पगारवाढ देखील मिळणार आहे. त्याशिवाय कंपनीमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती देखील होणरा आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. लक्कड यांनी नुकतीच पीटीआयला मुलाखल दिली.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा कर्मचार्यांना काढून टाकण्याचा कोणताही हेतू नाही. TCS मध्ये आम्ही प्रतिभा नोकर तयार करतो. आमची कंपनी स्टार्टअप कंपन्यांच्या नोकऱ्या गमावलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार आहे. नोकर कपातीवर आमचा विश्वास नाही. आम्ही नोकरांमधील कलागुणांना वाव देतो. अनेक कंपन्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त लोकांना काम दिले आहे. त्यामुळे त्यांना कर्मचारी कपातीसारखे पाऊल उचलावे लागत आहे. जेव्हा एखादा कर्मचारी टीसीएसमध्ये सामील होतो, तेव्हा त्याला उत्पादक बनविण्याची जबाबदारी कंपनीची असते, अशी माहिती लक्कड यांनी दिली.
कंपनीत सुमारे 6 लाख कर्मचारी
लक्कड यांनी सांगितले की, अनेकवेळा अशी परिस्थिती येते की कर्मचार्याकडे उपलब्ध असलेली कार्यक्षमता आम्हाला आवश्यकतेपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत आम्ही कर्मचाऱ्याला वेळ देतो आणि त्याला प्रशिक्षण देतो. टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या सहा लाखांहून अधिक आहे. यावेळीही कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात गेल्या अनेक वर्षांच्या मानधनात वाढ करणार आहोत.
जगभरातील कंपन्यामध्ये कापत
खर्च कमी करण्याचे कारण देत जगभरातील अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. परंतु, मंदीच्या भीतने कंपन्या नोकर कपातीचा निर्णय घेत आहेत. जगभरात वाढत्या महागाईमुळे आर्थिक मंदीची गडद छाया तयार झाली आहे. आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्यासाठी अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच कर्मचाऱ्यांच्या कपातीला सुरूवात झाली आहे. 2023 मध्ये अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. झिक स्ट्रीमिंगची दिग्गज कंपनी स्पॉटिफाई टेक्नोलॉजीने देखील कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत 15,3110 कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून 15,3110 तांत्रिक कर्मचार्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाण 51.489 पर्यंत वाढले आहे. Meta, Twitter, Oracle, Navida, Snap, Uber इत्यादी अनेक मोठ्या कंपन्यांनी 2022 मध्ये काम बंद केले आहे. या पुढे देखील जगभरातील अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)