Tata Group : टाटा ग्रुपच्या 'या' कंपनीकडून गुंतवणूकदारांना 17 वर्षात 3000 टक्के रिटर्न्स
17 वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने टीसीएस कंपनीच्या आयपीओमध्ये 850 रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता त्याचे मूल्य 28,000 रुपये झाले आहे.
मुंबई : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही टाटा समूहाची कंपनीने 2004 मध्ये शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाली. तेव्हापासून टाटा कन्सल्टन्सीने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 3000 टक्के नफा दिला आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन (N Chandrashekhar) टीसीएसच्या व्हर्च्युअल अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये म्हणाले की, जर 17 वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने टीसीएस कंपनीच्या आयपीओमध्ये 850 रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता त्याचे मूल्य 28,000 रुपये झाले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर 17 वर्षांत टीसीएसच्या भागधारकांना 3000 टक्क्यांपेक्षा जास्त नफा झाला आहे.
कोरोना संकटाच्या काळात दोन्ही लाटांदरम्यान टाटा समूहाने 2500 कोटी रुपयांची विविध प्रकारे मदत केली आहे. कोरोना रुग्णांसाठी 3300 बेडची सुविधा निर्माण केली होती. तसेच ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी उत्पादन 1100 टनपर्यंत वाढवलं होतं, असं चंद्रशेखरन यांनी सांगितलं.
चंद्रशेखरन यांनी टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एफसी कोहली यांचेही कौतुक केले, जे 17 वर्षांपासून कंपनीचे प्रमुख आहेत. त्यांनी म्हटलं की, या दीर्घ कालावधीत कोहली यांनी बर्याच तांत्रिक बदलांवर यशस्वीरित्या मात केली आणि पुढे गेले. त्यांनी सतत संशोधनात तसेच लोकांमध्येही गुंतवणूक केली, ज्यामुळे टीसीएस देशातील एक नंबरची आयटी कंपनी बनली. कोहली यांचे आभार मानत चंद्रशेखरन म्हणाले की, त्यांनी टीसीएससाठी आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाने एक वेगळी संस्कृती तयार केली. टीसीएसने या महामारीच्या युगात तांत्रिक अपग्रेडेशन केले आहे आणि ग्राहकांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात रुपांतर करण्यास मदत केली आहे.
Upcoming IPO Release: पुढील आठवड्यात चार मोठ्या कंपन्या आपला IPO जारी करणार, वाचा सविस्तर
चंद्रशेखरन यांनी पुढे म्हटलं की, महामारीच्या काळात कंपनीने तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांमध्ये डिजिटल रूपांतर केले. साथीच्या आजाराच्या कठीण काळात, टीसीएसने आपले बिझनेस मॉडेल इन्होवेट केले आणि डेटासह अॅनालिटिक्सवर फोकस केले. क्लाऊड इकोसिस्टमलाही ट्रान्सफॉर्म केले. आम्ही डिमांड पूर्ण करण्यास तयार आहोत. कंपनी यासाठी नवीन टॅलेंटची भरतीही करत राहील. तसेच इन हाऊस टॅलेंटमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवेल. सध्याच्या घडीला टीसीएसमध्ये 4.88 लाख कर्मचारी काम करतात.
Old Coin-Notes : एक रुपयाची जुनी नोट तुम्हाला बनवू शकते लखपती; कसं? वाचा सविस्तर