एक्स्प्लोर

पैसे ठेवा तयार! लवकरच येणार स्विगीचा मोठा आयपीओ, पैसे कमवण्याची जबरदस्त संधी

सध्या भारतीय भांडवली बाजारात आयपीओंसाठी सकारात्मक स्थिती आहे. अनेक दिग्गज कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. अशा स्थितीत आता आणखी एक दिग्गज कंपनी आयपीओच्या मदतीने पैसे उभे करणार आहे.

Swiggy IPO : शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्स या तगड्या आयपीओला मिळणारा प्रतिसाद पाहून अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ घेऊन येण्यासाठी तयारी केली आहे. अनेक गुंतवणूकदार आयपीओंमध्ये भरभरून गुंतवणूक करत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन फूड डिलीव्हरी प्लेटफॉर्म स्विगी (Swiggy) या कंपनीनेही आपला आयपीओ घेऊन येण्याचे ठरवले आहे. ही कंपनी आगामी  2 ते 3 दिवसांत आयपीओसंदर्भातील कागदपत्रे बाजार नियामक सेबीकडे सोपवू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार स्विगी या कंपनीच आईपीओ (Swiggy IPO) साधारण एक अब्ज डॉलर्स म्हणजेच 8300 कोटी रुयपांचा असण्याची शक्यता आहे. आयपीओंसाठी सध्या शेअर मार्केटमध्ये सकारात्मक स्थिती आहे. गुंतवणूकदारांची मानसिकता लक्षात घेता आता लवकरात लवकर आयपीओ घेऊन येण्यासाठी आता स्विगीकडून प्रयत्न चालू झाले आहेत. आयपीओच्या माध्यमातून पैसे उभारून झोमॅटो (Zomato) यासारख्या प्रमुख प्रतिस्पर्ध्याशी स्विगीला स्पर्धा करायची आहे.

आयपीओची साईझ किती असेल 

बिझनेस स्टॅडर्डच्या सूत्रांनुसार आगामी आठवड्याती ही कंपनी कोणत्याही क्षणी आयपीओसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा करू शकते. सेबीही लवकरत स्विगीच्या आयपीओला मंजुरी देण्याची आशा व्यक्त केली जात आहे. ही मंजुरी मिळताच स्विगी आयपीओ संदर्भातील सर्व महत्त्वाच्या तारखांची घोषणा करणार आहे. कंपनी त्यासाठीची तयारी करून ठेवली आहे. सेबीने मंजुरी दिल्यानंतर स्विगीचा आयपीओ आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या आयपीओंमधील एक असेल. साधारण एक अब्ज डॉलर्सचा हा आयपीओ असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आयपीओच्या आकारात भविष्यात बदलही होऊ शकतो.

झोमॅटोने अगोदरच मारली बाजी

स्विगी या कंपनीची स्थापना 2014 साली झालेली आहे. ही कंपनी साधारण 1.5 लाख रेस्टॉरंट्सशी जोडली गेलेली आहे. या रेस्टॉरंट्सच्या मदतीने स्विगी ही कंपनी देशभरात जेवण पोहोचवते. या कंपनीची प्रमुख प्रतिस्पर्धी ही झोमॅटो कंपनी आहे. ही कंपनी याआधीच शेअर बाजारावर सूचिबद्ध झालेली आहे. काही दिवसांपूर्वी स्विगीने क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इंस्टामार्टचे (Instamart) अधिग्रहण केलेले आहे. तेव्हापासून अॅमोझॉन इंडिया (Amazon India) टाटा ग्रुपची (Tata Group) बिगबास्केट (BigBasket)  या कंपनीकडूनही स्विगीला आव्हान मिळता आहे. 

ह्युंदाई, एलजी इलेक्ट्रॉनिक्सचाही आयपीओ येणार 

ब्लूमबर्गच्या डेटानुसार सध्या देशात आयपीओंसाठी चांगली स्थिती आहे. आयपीओ आणून देशातील कंपन्यांनी आतापर्यंत 7.8 अब्ज डॉलर्स उभे केले आहेत. आगामी महिन्यात ह्युंदाई मोटर ही कंपनी (Hyundai Motor IPO) भारतात आपला सर्वांत मोठा आयपीओ घेऊन येण्याची शक्यता आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स (LG Electronics IPO) ही कंपनीदेखील आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. हा आयपीओ 1.5 अब्ज डॉलर्सचा असू शकतो.

हेही वाचा :

रिटायरमेंटचं प्लॅनिंग करताना 'या' पाच चुका कधीच करू नका, अन्यथा म्हातारपणी होऊ शकते आर्थिक अडचण!

गोंधळ गडबड नको! सोमवारी फक्त 'या' तीन शेअर्सवर ठेवा नजर, होऊ शकतो भरभक्कम प्रॉफिट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुड न्यूज, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
Mumbai Nagpur Highway Accident: आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
धक्कादायक! पुण्यातील डीवाय पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब? डॉगस्कॉडसह बीडीएसपथक दाखल; विद्यार्थी वर्गाबाहेर
धक्कादायक! पुण्यातील डीवाय पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब? डॉगस्कॉडसह बीडीएसपथक दाखल; विद्यार्थी वर्गाबाहेर
Beed VIDEO: बीड जिल्ह्यात किती बॉस? सगळ्याच आमदारांच्या निकटवर्तीयांची गुंडगिरी जोरात
बीड जिल्ह्यात किती बॉस? सगळ्याच आमदारांच्या निकटवर्तीयांची गुंडगिरी जोरात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaAjay Munde PC Beed : धनंजय मुंडेंचा भाऊ मैदानात, अजय मुंडे यांचे Suresh Dhas यांच्यावर टीकास्त्रAjay Munde On Suresh Dhas:'सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत ते दिसतंय त्यांचा खोक्या बाहेर पडलाय'Devendra Fadnavis:भोंग्याला सरसकट परवानगी नाही, उल्लंघन केल्यास परवानगी कायमची रद्द :देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुड न्यूज, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
Mumbai Nagpur Highway Accident: आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
धक्कादायक! पुण्यातील डीवाय पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब? डॉगस्कॉडसह बीडीएसपथक दाखल; विद्यार्थी वर्गाबाहेर
धक्कादायक! पुण्यातील डीवाय पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब? डॉगस्कॉडसह बीडीएसपथक दाखल; विद्यार्थी वर्गाबाहेर
Beed VIDEO: बीड जिल्ह्यात किती बॉस? सगळ्याच आमदारांच्या निकटवर्तीयांची गुंडगिरी जोरात
बीड जिल्ह्यात किती बॉस? सगळ्याच आमदारांच्या निकटवर्तीयांची गुंडगिरी जोरात
Hardik Pandya : पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
Home Loan : गृहकर्जावर 700000 पर्यंत करसवलत, लाभ कसा घ्यायचा? कर्ज घेण्यापूर्वी काय करावं? जाणून घ्या
गृहकर्जावर 700000 पर्यंत करसवलत, लाभ कसा घ्यायचा? कर्ज घेण्यापूर्वी काय करावं? जाणून घ्या
सोन्याचे भाव पुन्हा कडाडले!
सोन्याचे भाव पुन्हा कडाडले!
बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget