(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रिटायरमेंटचं प्लॅनिंग करताना 'या' पाच चुका कधीच करू नका, अन्यथा म्हातारपणी होऊ शकते आर्थिक अडचण!
निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखा-समाधानात जायला हवं, असं वाटत असेल तर आतापासूनच सेव्हिंग करणं गरजेचं आहे. तसं केलं नाही तर भविष्यात तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं.
मुंबई : नोकरीवर असणारा प्रत्येकजण आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करत असतो. निवृत्तीनंतर शक्यतो अनेकजण दुसरे कोणतेही काम करत नाहीत. निवृत्तीनंतर नोकरी नसते, पण वेगवेगळ्या कामांसाठी लागणारा खर्च मात्र कायम असतो. त्यामुळेच निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिक चणचणीत जाऊ नये म्हणून रिटायरमेंट प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. निवृत्तीनंतरच्या पेन्शनसाठी अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून सेव्हिंग करतात. मात्र निवृत्तीचे नियोजन करताना अनेकजण काही चुका करतात. या चुकांमुळे निवृत्तीनंतरचे आयुष्य कठीण होऊन बसते. याच कारणामुळे निवृत्तीचे नियोजन करत असताना कोणत्या चुका करू नये हे जाणून घेऊ या...
EPF अवलंबून राहू नये
ईपीएफ खात्यात सेव्हिंग होत आहे, त्यामुळे आता चिंता नाही, असे अनेकांना वाटते. याच कारणामुळे वृद्धात्त्वासाठी अनेकजण कोणतेही नियोजन करत नाहीत. ईपीएफ खात्यात तुम्ही जमा करत असलेल्या रकमेवर किती व्याज द्यायचे हे सरकार ठरवते. मात्र ईपीएफमधील गुंतवणुकीपेक्षा अधिक चांगला परतावा देणारे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळेच निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी संपूर्णपणे ईपीएफवर अवलंबून राहू नका.
नोकरी बदलल्यानंतर ईपीएफ ट्रान्सफर न करणे
अनेकजण नोकरी बदलल्यानंतरही ईपीएफ ट्रान्सफर करत नाहीत. परिणामी त्याचा मिळणाऱ्या व्याजावर परिणाम पडतो. त्यामुळेच नोकरी बदलल्यानंतर जुन्या कंपनीतील ईपीएफ नव्या कंपनीत ट्रान्सफर करून घ्यावा.
उशिरा सेव्हिंग चालू करणे
नोकरी लागल्यानंतर अनेकजण आताच सेव्हिंग कशाला चालू करायची, असा विचार करतात. काही वर्षांनंतर आपण निवृत्तीसाठी पैसे जमा करायला सुरुवात करू, असेही काही जण म्हणतात. मात्र तुम्ही निवृत्तीसाठी सेव्हिंग करायला जेवढा उशीर कराल, तेवाढे तुम्हाला कमी पैसे मिळतील. निवृत्तीनंतर तुमच्याकडे खूप सारे पैसे असावेत, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर सेव्हिंगला सुरुवात करायला हवी.
60 वर्षानंतर निवृत्ती होते, असे गृहित धरणे
तसं पाहायचं झालं तर निवृत्तीचे वय हे अधिकृतपणे 60 वर्षे आहे. सध्याच्या घडीला बहुसंख्य लोक हे मोठ्या प्रेशरखाली काम करतात. त्यामुळे अशा स्थितीत 60 वर्षांपर्यंत काम करणे कठीण झाले आहे. नोकरी लागल्यानंतर लगेच निवृत्तीचे प्लॅनिंग चालू केले तर तुम्हाला 60 वर्षांपर्यंत काम करण्याची गरज नाही. त्याआधीही भरपूर पैसे जमा झाल्यामुळे तुम्ही 60 वर्षांच्या अगोदरच निवृत्तीचा निर्णय घेऊ शकता.
महागाईकडे दुर्लक्ष करणे
अनेकजण निवृत्तीसाठी सेव्हिंग करतात. मात्र सेव्हिंग करताना ते 25 ते 30 वर्षांनी येणाऱ्या महागाईबद्दल विचार करत नाही. आजच्या महागाईच्या हिशोबानेच ते पैसे सेव्ह करतात.त्यामुळे विवृत्तीनंतर मिळणारे पैसे पुरेसे ठरत नाहीत. याच कारणामुळे भविष्यकालीन महागाई लक्षात घेऊनच निवृत्तीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
गोंधळ गडबड नको! सोमवारी फक्त 'या' तीन शेअर्सवर ठेवा नजर, होऊ शकतो भरभक्कम प्रॉफिट
कधीकाळी पेपर टाकला, दूध विकलं, आज 400 कारचा मालक, स्वत:च्या हिमतीवर करोडपती झालेल्या 'बाबू'ची कहाणी!
स्टॉक मार्केटमध्ये धमाका! या आठवड्यात पाच नवे आयपीओ येणार; पैशांचा पाऊस पडणार?