मोठी बातमी! सुकन्या समृद्धी योजनेसह आणखी एका महत्त्वाच्या योजनेत मोठे बदल, नवे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार!
ऑक्टोबर महिन्यात अनेक शासकीय नियमांत बदल झाले आहेत. विशेष म्हणजे 1 ऑक्टोबर रोजीपासून सुकन्या समृद्धी योजना तसेच पीपीएफ योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
मुंबई : आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. या नव्या महिन्यासह अनेक नियमांत बदल झाले आहेत. याच महिन्यापासून सरकारच्या दोन महत्त्वाच्या योजनांत बदल झाले आहेत. या दोन्ही योजनांचे नाव पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund) आणि सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme) असे आहे. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास या दोन्ही योजनांच्या माध्यमातून चांगला परातावा मिळतो. सरकारच्या पीपीएफ या योनजेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू सकतो. तर सुकन्या समृद्धी योजनेत फक्त 10 वर्षांपर्यंतच्या मुलींच्या नावेच गुंतवणूक करता येते. याच दोन्ही योजनांत आता सरकराने महत्त्वाचे बदल केल आहेत.
मुलींचे भवितव्य सुरक्षित राहावे हा प्रमुख उद्देश समोर ठेवू सरकारने सुकन्या समृद्धी योजना लागू केलेली आहे. तर आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक अडचण येऊ नये म्हणून सरकारने पीपीएफ या योजनेला सुरुवात केलेली आहे. या दोन्ही योजनेतील काही नियम सध्या बदलले आहेत.
पीपीएफ योजनेच्या नियमात नेमका कोणता बदल झाला?
पीपीएफ योजनेतील पहिला बदल - अल्पवयीन पाल्यासाठी खोलण्यात आलेल्या पीपीएफ अकाऊंटसंदर्भात पहिला नियम बदलण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार आता अल्पवयीन मुलांसाठी खोलण्यात आलेल्या पीपीएफ अकाऊंटवर संबंधित मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटच्या हिशोबाने व्याज मिळेल. त्यानंतर मुलगा 18 वर्षांचा झाल्यानंतर PPF योजनेनुसार व्याजदर लागू होईल. तसेच म्यॅच्यूरीचा कालावधी 18 व्या वर्षांपासून मोजला जाईल.
दुसरा बदल- एकापेक्षा अधिक पीपीएफ खाते असतील तर प्रायमरी खात्यावर सध्याचा व्याजदर लागू होईल. तसेच सेकंडरी खात्याला प्रायमरी खात्यात मर्ज केले जाईल. दोनपेक्षा अधिक खाते असतील तर त्या खात्यांवर खाते चालू केलेल्या तारखेपासून शून्य व्याज मिळेल.
सुकन्या समृद्धी योजनेत नेमका काय बदल झाला?
आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून सुकन्या समृद्धी योजनेत बदल झाले आहेत. नव्या नियमानुसार आजोबा-आजीने संबंधित मुलीच्या नावे Sukanya Samriddhi योजनेत खाते चालू केले असेल तर असे खाते मुलीच्या आई-वडिलांकडे वर्ग करण्यात येईल. दोनपेक्षा अधिक खाते असतील तर अतिरिक्त असलेले खाते बंद करण्यात येईल.
हेही वाचा :
दिवाळीपूर्वीच झटका! ऐन सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडर महागले; नवे दर लागू!
'या' पाच स्टॉक्समध्ये गुंतवा अन् एका वर्षासाठी विसरून जा; मिळू शकतात पैसेच पैसे!
NTPC, स्विगी ते ह्युंदाई, पुढच्या तीन महिन्यांत तब्बल 60000 कोटींचे आयपीओ, पैसे ठेवा तयार!