![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Share Market News : आयटी आणि FMCG मध्ये नफावसुलीचा जोर; शेअर बाजार घसरणीसह बंद
Share Market News : भारतीय शेअर बाजारात आज नफावसुलीचा जोर दिसल्याने बाजारात काही प्रमाणात घसरण झाली.
![Share Market News : आयटी आणि FMCG मध्ये नफावसुलीचा जोर; शेअर बाजार घसरणीसह बंद Stock Markets close in red as Sensex ends 221 points down while nifty close below 17750 level Share Market News : आयटी आणि FMCG मध्ये नफावसुलीचा जोर; शेअर बाजार घसरणीसह बंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/aa49610c40c3139369eb1299964de7481675766372349290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Share Market News : जागतिक शेअर बाजारात दिसून आलेल्या संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव दिसून आला. भारतीय रिझर्व्ह बँक आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून जाहीर होणाऱ्या पतधोरणावरून बाजार अलर्ट मोडवर असल्याचे चित्र आहे. आज आयटी आणि एफएमसीजी सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्समध्ये 221 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांक 17750 अंकांखाली स्थिरावला.
आज दिवसभरातील व्यवहारात निफ्टी निर्देशांकात ऑटो आणि एफएमसीजी इंडेक्समध्ये एक टक्क्यांची घसरण दिसून आली. मेटल आणि आयटी इंडेक्समध्येही विक्रीचा जोर दिसून आला. आज मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स 220.86 अंकांच्या घसरणीसह 60,286.04 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी 43.10 अंकांच्या घसरणीसह 17,721.50 अंकावर स्थिरावला. बाजारात व्यवहार झालेल्या कंपन्यांपैकी 1559 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1854 शेअर दरात घसरण दिसून आली. तर, 124 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
इंडेक्स | किती अंकांवर बंद | दिवसभरातील उच्चांक | दिवसभरातील नीचांक | किती टक्के बदल |
BSE Sensex | 60,270.78 | 60,655.14 | 60,063.49 | -0.39% |
BSE SmallCap | 27,955.04 | 28,077.64 | 27,875.33 | -0.16% |
India VIX | 14.13 | 14.88 | 13.665 | -3.83% |
NIFTY Midcap 100 | 30,663.80 | 30,760.15 | 30,502.80 | -0.02% |
NIFTY Smallcap 100 | 9,399.65 | 9,495.00 | 9,371.60 | -0.71% |
NIfty smallcap 50 | 4,244.85 | 4,292.15 | 4,235.40 | -0.79% |
Nifty 100 | 17,569.70 | 17,654.90 | 17,504.25 | -0.24% |
Nifty 200 | 9,207.30 | 9,249.45 | 9,171.25 | -0.21% |
Nifty 50 | 17,721.50 | 17,811.15 | 17,652.55 | -0.24% |
कोणत्या शेअरमध्ये चढ-उतार
आज बाजारात कोटक महिंद्राच्या शेअर दरात 1.48 टक्क्यांची तेजी दिसून आली. बजाज फायनान्समध्ये 0.83 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.66 टक्के, लार्सन 0.61, टीसीएसच्या शेअर दरात 0.31 टक्क्यांची तेजी दिसून आली. एसबीआयच्या शेअर दरात 0.21 टक्के, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, टाटा स्टीलच्या शेअर दरात 5.23 टक्क्यांची घसरण दिसून आली. आयटीसीमध्ये 2.65 टक्के, मारुती सुझुकीमध्ये 1.72 टक्के, एचसीएल टेकमध्ये 1.58 टक्के, टाटा मोटर्समध्ये 1.50 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याशिवाय, सनफार्मा, एचयूएल, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे शेअर देखील घसरणीसह बंद झाले.
बाजार भांडवलात वाढ
शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 266.05 लाख कोटी झाले होते. आज, सोमवारी बाजारातील तेजीमुळे बाजार भांडवल 266.54 लाख कोटी रुपये इतके झाले.
अदानी पोर्ट्सच्या नफ्यात घट
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचा (APSEZ) एकत्रित निव्वळ नफा डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 12.94 टक्क्यांनी घसरून 1,336.51 कोटी रुपयांवर आला आहे. अदानी पोर्टस् या कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1,535.28 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. एकूण उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4,713.37 कोटी रुपयांवरून 5,051.17 कोटी रुपये झाले. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या नफ्यात घट झाली असली उत्पन्नात वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)