एक्स्प्लोर

Share Market Closing Bell: नफावसुलीने शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 170 अंकांच्या घसरणीसह बंद

Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज नफावसुलीमुळे घसरण दिसून आली. बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 170 अंकांनी घसरला होता.

Share Market Closing Bell:  भारतीय शेअर बाजारातील आजचे व्यवहार घसरणीसह बंद झाले. आठवड्यातील पहिल्या दिवशी बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला. सकाळी बँक निफ्टीत (Bank Nifty) तेजी दिसून आली होती. मात्र, त्यानंतर घसरण दिसून आली. 

आज दिवसभरातील व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 170.89 अंकांच्या घसरणीसह 61,624.15 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 20.55 अंकांच्या घसरणीसह 18,329.15  अंकांवर स्थिरावला. 

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 16 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 14 कंपन्याच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 26 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 24 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 

निफ्टीतील सेक्टोरियल इंडेक्समध्ये ऑटो, आयटी, मेटल, फार्मा, रियल्टी, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. तर, बँक, वित्तीय सेवा, एफएमसीजी, मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तू आदी सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 

सेन्सेक्समध्ये आज कोटक बँक 1.26 टक्के, टाटा स्टील 1.07 टक्के, पॉवरग्रीडच्या शेअर दरात 1.05 टक्के, इंडसइंड बँक 1.04 टक्के आणि इन्फोसिसच्या शेअर दरात 0.89 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्याशिवाय, एचसीएल टेक, मारुती, टीसीएस, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स आणि बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

सेन्सेक्समध्ये आज भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्री, एल अॅण्ड टी,  महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, विप्रो, टायटन, एनटीपीसी, बजाज फायनान्स, नेस्ले, आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँक, एचयूएल, आयटीसी आणि डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली. 

सकाळपासून बाजारात अस्थिरता

सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) सेन्सेक्स 29.18 अंकांच्या घसरणीसह 61,765.86 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (NSE) निफ्टी 26.70 अंकांनी वधारत 18,376.40 अंकांवर खुला झाला.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget