Amazon Layoff : Twitter आणि Meta नंतर आता Amazon मध्येही नोकरकपात, 3766 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
Amazon Layoff 2022 : मीडिया रिपोर्टनुसार, ॲमेझॉन कंपनीने गेल्या आठवड्यातच नवीन भरती थांबवल्याची घोषणा केली. यानंतर आता कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Layoff in Amazon 2022 : मायक्रोसॉफ्ट ( Microsoft ), ट्विटर ( Twitter ) आणि मेटानंतर ( Meta ) आता ई-कॉमर्स कंपनी ( E-Commerce Company ) ॲमेझॉन ( Amazon ) मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात ( Layoff ) करणार आहे. ॲमेझॉन कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांची कंपनी धोक्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता ॲमेझॉन कंपनीनेही नोकर कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याशिवाय कंपनीने नवीन भरतीवरही तात्काळ बंदी घातली आहे. ॲमेझॉन कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचं कारण देत सध्या भरती थांबवण्यात आली आहे. त्यानंतर 3700 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात येणार आहे.
आर्थिक मंदीमुळे ॲमेझॉन कंपनीचा मोठा निर्णय
आर्थिक मंदीमुळे ॲमेझॉन कंपनीने तोट्यात असलेल्या प्रक्रिया बंद करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने गेल्या आठवड्यातच हायरिंग फ्रीजची घोषणा केली. यानंतर आता कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या आधीही बड्या कंपन्यांकडून नोकरकपात
याआधी मायक्रोसॉफ्ट ( Microsoft ), ट्विटर ( Twitter ) आणि मेटानंतर ( Meta ) या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून हटवलं होतं. आर्थिक नुकसानीमुळे या कंपन्यांनी हा निर्णय घेतला. फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीने 11 हजार कर्मचारी हटवले. तर ट्विटरने निम्मे कर्मचारी कामावरून काढून टाकले. त्यानंतर आता अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉननेही नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे.
रोबोटिक्स विभागातील कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
कंपनीकडून रोबोटिक्स विभागातील कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आहे. ॲमेझॉनमध्ये काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर जेमी झांगने लिंक्डइनवर माहिती दिली की, त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आलं आहे. शिवाय, एका माजी कर्मचाऱ्याच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, संपूर्ण रोबोटिक्स विभागाला नोटीस देण्यात आली असून त्यांच्या नोकरी गदा येऊ शकते. लिंक्डइन डेटानुसार, कंपनीच्या रोबोटिक्स विभागात किमान 3,766 लोक काम करतात. 3,766 पैकी किती कर्मचार्यांना कामावरून काढण्यात येणार आहे, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
फायदा नसलेल्या विभागांतून करणार कर्मचारी कपात
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, ॲमेझॉन कंपनीने आपल्या काही फायदा नसलेल्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावत दुसरीकडे नोकरी शोधण्यास सांगितलं आहे. अलिकडे मेटा आणि ट्विटर कंपनीनेही मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी नोकरकपातीचा निर्णय घेतल्याचे मेटाने सांगितलं. तर वाढलेला खर्च आणि उत्पन्नात घट यामुळे ट्विटरनेही अनेक कर्मचाऱ्यांना हटवलं