RBI ने 'या' बँकांना ठोठावला दंड, नियमांचं उल्लंघन केल्यामुळं कारवाई; ग्राहकांवर परिणाम होणार का?
नियमांचे उल्लंघन केल्यामुळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank India) काही बँकांवर कारवाई केली आहे. RBI ने या सहकारी बँकांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे.

RBI Penalty: नियमांचे उल्लंघन केल्यामुळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank India) काही बँकांवर कारवाई केली आहे. RBI ने या सहकारी बँकांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. ज्या सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे त्यात एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरातची मेहसाणा नागरीक सहकारी बँक आणि गुजरातची पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवते आणि बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करते. गुरुवार (18 जानेवारी 2024) बँकेने पाच सहकारी बँकांवर कारवाई करून लाखोंचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे पाऊल उचलले आहे.
कोणत्या बँकेला किती दंड ठोठावला?
रिझर्व्ह बँकेने NKGSB सहकारी बँकेला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेने चालू खाते उघडताना आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही. तसेच ग्राहकांना खात्यात व्यवहार करण्याची परवानगी दिली होती, असे या प्रकरणाची माहिती देताना RBI ने म्हटलं आहे. RBI ने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ज्यामध्ये बँकेने दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधानी न झाल्यास, RBI ने NKGSB सहकारी बँकेला 50 लाख रुपयांचा संपूर्ण आर्थिक दंड ठोठावला आहे.
मुंबईच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला 15 लाख रुपयांचा दंड
रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने दिलेल्या पैशाच्या नियमांचे पालन न केल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात बँकेने नफ्यातून देणगी देताना आरबीआयचे नियम नीट पाळले नाहीत. याशिवाय कर्ज आणि अॅडव्हान्स देताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने गुजरातमधील मेहसाणा सहकारी बँकेला 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतर नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दि पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड आणि मेहसाणा नागरी सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.
बँकेच्या ग्राहकांवर परिणाम होणार का?
आरबीआयने बँकांवर केलेल्या कारवाईमुळं आर्थिक दंडाचा बँक ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. हा दंड बँकांच्या कामकाजाशी संबंधित कामांवर लावण्यात आला आहे. ग्राहकांच्या सेवेवर याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. बँकांचे कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Mutual Fund : म्युचुअल फंड हा गुंतवणूक आणि तारण कर्जाचा नवा पर्याय, क्रेडिट कार्डपेक्षा कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
