एक्स्प्लोर

Share Market : वाद नवरा-बायकोचा, गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर; 'या' कंपनीचे शेअर दर घसरले

Raymond Shares : नवरा-बायकोमधील भांडणाचा फटका कंपनीच्या शेअर दराला बसत आहे. मागील सात दिवसात गुंतवणुकदारांचे 1500 कोटी बुडाले आहेत.

मुंबई : शेअर बाजारात (Share Market) सुरू असलेल्या चढ-उतारांदरम्यान एका कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. या स्टॉकच्या शेअर दरात  गेल्या 7 दिवसांत 12 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या शेअर दराच्या घसरणीसाठी नवरा-बायकोचे भांडण जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. नवरा-बायकोच्या भांडणाने मात्र गुंतवणुकदारांच्या जीवाला घोर लागला आहे. हा शेअर जगातील सर्वात मोठी सूट फॅब्रिक कंपनी रेमंड लिमिटेडचा (Raymond Ltd) आहे. 

रेमंडच्या शेअर्स दरात (Raymond Ltd Share Price) सातत्याने घसरण होत आहे. या शेअरच्या घसरणीमागे पती-पत्नीमधील मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. रेमंड कंपनीचे अध्यक्ष गौतम सिंघानिया (Gautam Singhania) आणि त्यांची पत्नी नवाज मोदी (Nawaz Modi Singhania) यांनी नुकतेच वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. या बातमीनंतर रेमंडच्या शेअर्समध्ये घसरण होत असल्याचे चित्र आहे. 

शेअर दरात आजही घसरण कायम 

रेमंड कंपनीच्या शेअर्समध्ये आजही घसरण पाहायला मिळाली. आज रेमंडचा शेअर 66 अंकांपेक्षा अधिक घसरणीसह 1,676 रुपयांवर बंद झाला. रेमंड कंपनीचे मार्केट कॅपही घसरले आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 180 दशलक्ष डॉलरने कमी झाले आहे. काही वृत्तांनुसार, नवाज मोदींनी गौतम सिंघानिया यांच्या संपत्तीत 75 टक्के हिस्सा मागितला आहे.  गौतम सिंघानिया यांची एकूण संपत्ती 1.4 अब्ज डॉलरची असल्याची चर्चा आहे.

गुंतवणुकदारांना पाच वर्षात चांगला परतावा 

रेमंडच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. गेल्या 5 वर्षात रेमंडच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 107 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. हे शेअर्स एका वर्षात 29 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. मात्र, आता शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. 

(Disclaimer : या बातमीद्वारे शेअर्स विक्री अथवा खरेदीचा दिला जात नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. कोणत्याही अभ्यासाशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करू नका. असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांशी चर्चा करा.)

 इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Nashik Crime : सर्वत्र वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष, नाशकात मात्र टवाळखोरांकडून गोळीबार अन् कोयत्याने राडा; पाच जखमी
सर्वत्र वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष, नाशकात मात्र टवाळखोरांकडून गोळीबार अन् कोयत्याने राडा; पाच जखमी
Devyani Pharande : 'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3:00 PM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सvasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलंAdvocate Aniket Nikam on IPC : आधी राजद्रोह हा गुन्हा होता, आता तो कायदा नसणारIPC Act India : भारतीय न्याय संहितेत नेमकं काय ? कोणत्या कलमांचा  समावेश?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Nashik Crime : सर्वत्र वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष, नाशकात मात्र टवाळखोरांकडून गोळीबार अन् कोयत्याने राडा; पाच जखमी
सर्वत्र वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष, नाशकात मात्र टवाळखोरांकडून गोळीबार अन् कोयत्याने राडा; पाच जखमी
Devyani Pharande : 'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
Hardik Pandya: छपरी म्हणत भरमैदानात व्हिलन ठरवलं, त्याच हार्दिक पांड्याने एका ओव्हरमध्ये 24 धावा कुटणाऱ्या क्लासेनला टिपलं अन् सामना फिरला
क्लासेनने धुळधाण उडवली, भारतीयांनी आशा सोडल्या, पण 'छपरी' म्हणवल्या गेलेल्या हार्दिक पांड्याने गेम फिरवला
Embed widget