एक्स्प्लोर

Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....

दोन मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी एकमेकांशी मराठीतच बोललं पाहिजे, यातून जातीच्या भिंती निघून जातील, असे राज ठाकरे म्हणाले.

पुणे: कल्याणीनगर पोर्शे प्रकरणावरुन (Porsche Car Accident)  राज ठाकरेंनी (Raj Thackeray)  सडकून टीका केलीय. अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा ही पैशांच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत.  महाराष्ट्रातल्या पक्षफुटीवरुनही त्यांनी टोले लगावले. अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या वर्षीच्या अधिवेशनाला राज ठाकरे उपस्थित होते. या वेळी राज ठाकरेंची  एक प्रकट मुलाखत झली.  अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी  मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरेंनी राजकारण, समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला, या आणि अनेक अशा अनेक  विषयांविषयी आपली मते मांडली.  

राज ठाकरे म्हणाले,   पोर्शे अपघातात एका अल्पवयीन मुलाने दोन तरुणांना चिरडले. त्या अल्पवयीन मुलाच्या आईची, बापाची, आजोबाची चर्चा सुरू आहे. मात्र अपघातात मृत दोन तरुणांविषयी कोणीही बोलत नाही. मुलाच्या आई- वडिलांबाद्द बोलत नाही. ती केस कोर्टात गेल्यानंतर तिथला जज  त्याला 300 शब्दाचा निबंध लिहायला लावतो. हा कोणता जज आहे.  पैशाची देवणघेवाण झाल्याशिवाय अशा प्रकारची गोष्ट कोर्टात होऊ शकत नाही. अशा गोष्टी घडल्यानंतर  मग तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार पोलीसांवर, कोर्टावर, सरकारवर? जनतेचा विश्वास उडाला तर आपण अराजकाकडेच जाणार आहे. 

अमेरिकेत तुम्ही पोलीसांवर हात उचलू शकत नाही.  आपल्याकडे महाराष्ट्रात कोणी येत पोलीसावर हात उचलतो पुढे काही होत नाही त्याला एक दिवस जेल होते त्याला बाहेर सोडून देतात. पोलीसांवर हात टाकता हे अतिशय गंभीर आहे. किती खाली जायचे याला काही मर्यादा आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.  

दोन मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे : राज ठाकरे

 राज ठाकरे म्हणाले,  आज जरी महाराष्ट्र जातीपातीत अडकला असला तरी हा महाराष्ट्र यातून निश्चितपणे बाहेर निघेल आणि महाराष्ट्राला मी यातून बाहेर काढेन. यासाठी, तो महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस असेल की, महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस असेल त्याला जोडणारा एक दुवा म्हणजे मराठी भाषा. ही भाषा त्याने कधीही विसरता कामा नये, जिथे दोन मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी एकमेकांशी मराठीतच बोललं पाहिजे, यातून जातीच्या भिंती निघून जातील आणि 'मराठी' म्हणून आपला एकसंध समाज उभा राहील. यासाठी तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाने पण प्रयत्न केले पाहिजेत. 

Raj Thackera Video :

हे ही वाचा :

Pune Car Accident: अग्रवालांच्या लेकाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा पोर्शेचा स्पीड 110 किमी होता; फडणवीसांनी सांगितली पुणे अपघाताची इनसाईड स्टोरी

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget