एक्स्प्लोर

Bank Holidays in December 2023 : डिसेंबर महिन्यात 18 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

Bank Holidays in December 2023 : डिसेंबर महिन्यात 18 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत.

Bank Holidays in December 2023 : नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबर महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच वर्षाचा शेवटचा महिना सुरु होण्यापूर्वी बँक (Bank Holiday) एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग (Internet Banking), मोबाईल बँकिंगमुळे (Mobile Banking) लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास (Cash Withdrawal), डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही डिसेंबर महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेत जात असाल, तर या संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणं गरजेचं आहे. 

डिसेंबर महिन्यात 18 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार डिसेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार डिसेंबर महिन्यात एकूण 18 दिवस बँकांची सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.

सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in December 2023) : 

1 डिसेंबर 2023 : या दिवशी, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये राज्य उद्घाटन दिनानिमित्त बँक सुट्टी असेल.

3 डिसेंबर 2023 : रविवारमुळे या दिवशी बँकेला सुट्टी असेल.

4 डिसेंबर 2023 : सेंट फ्रांसिस जेवियर पर्वानिमित्त बॅंकेला सुट्टी असेल.

9 डिसेंबर 2023 : सेंट फ्रान्सिस झेवियर सणानिमित्त गोव्यात बँकेला सुट्टी, महिन्याचा दुसरा शनिवार

10 डिसेंबर 2023 : रविवारमुळे या दिवशी बँकेला सुट्टी असेल.

12 डिसेंबर 2023 : पा-तोगन नेंगमिंजा संगमामुळे बँकेला सुट्टी असेल.

13 डिसेंबर 2023 : लोसुंग/नामसुंगमुळे सिक्कीममध्ये बँकेला सुट्टी असेल.

14 डिसेंबर 2023 : Losung/Namsung मुळे सिक्कीममध्ये बँकांना सुट्टी असेल.

17 डिसेंबर 2023 : रविवारमुळे बँका बंद राहतील.

18 डिसेंबर 2023 : मेघालयात यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँकेला सुट्टी असेल.

19 डिसेंबर 2023 : गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यात बँकेला सुट्टी असेल.

23 डिसेंबर 2023 : महिन्याचा चौथा शनिवार 

24 डिसेंबर 2023 : रविवारमुळे बँका बंद राहतील.

25 डिसेंबर 2023 : ख्रिसमसमुळे देशभरात बँका बंद राहतील.

26 डिसेंबर 2023 : मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये नाताळनिमित्त बँका बंद राहतील. 

27 डिसेंबर 2023 : नाताळनिमित्त मेघायलमध्ये बॅंकांना सुट्टी असेल. 

30 डिसेंबर 2023 :  मेघालयमध्ये U Kiang Nangbah मुळे बँका बंद राहतील.

31 डिसेंबर 2023 : रविवारमुळे बँका बंद राहतील.

वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरु शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करु शकता. लाँग वीकेंडसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करु शकता.

महत्त्वाच्या बातम्या : 

Post Office : 'या' पोस्ट ऑफिस योजनांमध्ये ऑनलाइन गुंतवणूक सुविधा, घरबसल्या फक्त करा 'हे' काम; स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया वाचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, खरेदीदारांना मोठा फटका, जाणून घ्या आजचे दर?
सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, खरेदीदारांना मोठा फटका, जाणून घ्या आजचे दर?
8th Pay Commission:  आता 10 वर्ष थांबायला नको, 5 वर्षांमध्येच वेतन आयोगाचं पुनरावलोकन करा, कामगार संघटनांची मोठी मागणी 
10 वर्ष थांबायला नको, 5 वर्षांमध्येच वेतन आयोगाचं पुनरावलोकन करा, कामगार संघटनांची मोठी मागणी 
Gold-Silver Rate: इराण-अमेरिकेतील तणाव कमी होताच सोन्याच्या दरात मोठी उसळी, चांदीचा भावही वाढला, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव?
इराण-अमेरिकेतील तणाव कमी होताच सोन्याच्या दरात मोठी उसळी, चांदीचा भावही वाढला, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव?
युवकांसाठी मोठी संधी! फक्त मुलाखत द्या, सरकारी नोकरी मिळवा, नेमकी काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या सविस्तर माहिती  
युवकांसाठी मोठी संधी! फक्त मुलाखत द्या, सरकारी नोकरी मिळवा, नेमकी काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या सविस्तर माहिती  

व्हिडीओ

Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे
Jay Pawar on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार केवळ बारामतीच्याच नव्हे, तर मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवार
Punjab Blast : पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रीय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कालिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कालिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
Akola : अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं
Embed widget