एक्स्प्लोर

Nashik Crime : सर्वत्र वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष, नाशकात मात्र टवाळखोरांकडून गोळीबार अन् कोयत्याने राडा; पाच जखमी

Nashik Crime News : विश्वचषक सामना संपल्यानंतर नाशिकरोड परिसरात आनंद व्यक्त करताना दोन गटात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घडली. या राड्यात गोळीबार आणि कोयत्यांचा सर्रास वापर करण्यात आला.

Nashik Crime News नाशिक : दोन दिवसापूर्वी नाशिकरोड (Nashik Road) येथील मुक्तीधाम मागे (Muktidham) असलेल्या हॉटेल मथुराचे नितीन सचदेव यांच्यावर कोयता आणि रॉडने मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच विश्वचषक सामना संपल्यानंतर नाशिकरोड परिसरात आनंद व्यक्त करताना दोन गटात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घडली आहे. या राड्यात गोळीबार (Firing) आणि कोयत्यांचा सर्रास वापर करण्यात आला असून यात पाच जण जखमी झाले आहेत. 
 
याबाबत अधिक माहिती अशी की, काल भारताने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup 2024) विजेतेपद मिळवलं. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 7 धावांनी पराभव करत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. नाशिकरोड येथील विहितगाव परिसरातील मथुरा चौक येथे  विश्वचषक सामना संपल्यानंतर आनंद व्यक्त करताना देवळाली गाव आणि विहितगाव येथील गटात तुफान राडा झाला. यात गोळीबार आणि कोयत्यांचा वापर करण्यात आला.  

पाच जण जखमी 

यात एक गटाकडून युवकावर गोळीबार केल्याने एकाच्या मांडीला गोळी लागली. तर राड्यात झालेल्या मारहाणीत चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नाशिकरोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. देवळाली गाव येथे राहणाऱ्या आकाश सोमनाथ पवार यांच्या मांडीला गोळी लागली आहे. जुन्या कुरापतीवरून झालेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 

दोन आरोपींना अटक 

गोळीबाराची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार आणि हल्ल्या प्रकरणी दोन आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. हल्ला कशामुळे झाला आणि गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक कुठून आली याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

Devyani Pharande : 'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार

'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget