एक्स्प्लोर

Devyani Pharande : 'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार

Nashik News : महापौर, उपमहापौर, आमदार, अशी पद भूषवलेल्या व्यक्तीने महापालिकेच्या डीपी रोडवर चाळीस वर्षे अतिक्रमण करणे अतिशय गंभीर आहे, असेही देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे.

नाशिक : मुंबई नाका परिसरातील शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Camp) नेते माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांचे जनसंपर्क कार्यालयावर काल महापालिकेने (Nashik NMC) कारवाई केली. यानंतर वसंत गिते यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही कारवाई केली असून महापालिकेच्या आयुक्तांनीदेखील याबाबत स्पष्ट संकेत दिल्याचा दावा त्यांनी केला. आता यावरून देवयानी फरांदे यांनी वसंत गिते यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.  

आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, त्यांनी महत्वाचे सांगितले की, चाळीस वर्षांपासून हे ऑफिस होते. ती नाशिक महानगरपालिकेच्या डीपी रोडची जागा आहे. त्या जागेवर 40 वर्षापासून ऑफिस होते. या अतिक्रमण मोहिमेशी माझा कुठलाही संबंध नव्हता. डीपी रोडवर 40 वर्षापासून अतिक्रमण होतं. अतिक्रमण मोहीम राबवताना महापालिकेला खूप त्रास झाला. महापालिकेने अतिक्रमण काढले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. नागरिकांना त्याचा खूप आनंद झाला आहे, असे त्यांनी म्हटले. 

चाळीस वर्षे अतिक्रमण करणे अतिशय गंभीर 

देवयानी फरांदे पुढे म्हणाल्या की, त्या ठिकाणी जुगाराचा अड्डा चालवतात, तो देखील उद्ध्वस्त करण्यात आला आहे. त्यामध्ये पोलीस कर्मचारी देखील होते. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. महापौर, उपमहापौर, आमदार, अशी पद भूषवलेल्या व्यक्तीने महापालिकेच्या डीपी रोडवर चाळीस वर्षे अतिक्रमण करणे अतिशय गंभीर आहे, असे पलटवार त्यांनी यावेळी केला आहे.

त्यांच्याकडून व्याजासह भाडे घ्यावे

मी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती करेल की, काल मोहीम राबवताना झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करावा. चाळीस वर्षे त्यांनी महापालिकेची जागा वापरल्यामुळे त्यांच्याकडून व्याजासह भाडे महापालिकेने घ्यावे. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा कलंक आहे. अतिक्रमण मी काढलेले नाही. मला अतिक्रमण काढायचं असतं मी दहा वर्षांपूर्वी काढले असते. त्या भागातील अनेक लोकांच्या तक्रारी नाशिक महापालिकेकडे होत्या. नाशिक महापालिकेने गुंडशाहीला घाबरून त्या ठिकाणी आतापर्यंत कारवाई केली नव्हती, असेही त्यांनी यावेळी म्हटले.  

दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे

नाशिकमधील ड्रग्ज पेडलरवर माझ्यामुळे कारवाई केली. सभागृहात मी प्रश्न उपस्थित केले होते. दारूचे आणि जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे. चांगल्या व्यक्तीने आरोप केले असते तर मी त्याची दखल घेतली असती.  अतिक्रमण करून डीपी रोडपासून वंचित ठेवल्याने त्या भागातील नागरिकांची माफी मागावी. आपण आमदार, महापौर झाला. आपला मुलगा उपमहापौर झाला. या ठिकाणी ऑफिस टाकू शकतो. कोणी काही करू शकत नाही, असे आव्हान महापालिकेला त्यांनी दिलं होतं. ते माझ्या पाठीमागे कायम मला त्रास देण्याचे काम करत असतात. महिला रुग्णालय मंजूर करून आणले, त्याला देखील विरोध केला, असे असंख्य विषय आहेत, असा पलटवार त्यांनी यावेळी केला आहे.  

...तर इथून पुढे मला त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल

मी सूडबुद्धीने काम करत नाही. जर ते माझं नाव घेत असतील तर इथून पुढे मला त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल. त्यांच्या दबावामुळे नाशिक महापालिका 40 वर्ष कारवाई करू शकली नाही. मी अधिवेशनात व्यस्त होते. सुट्टीच्या दिवशी अतिक्रमण मोहीम जरी झाली असली तरी नागरिकांनी त्याचं स्वागत केलं आहे.  मी आरोप करत नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी त्या ठिकाणी जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त झाला आहे, असेही देवयानी फरांदे यांनी सांगितले आहे. 

आणखी वाचा 

'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Prithviraj Chavan and PM Modi: देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget