search
×

IPO : राकेश झुनझुनवाला भागीदार असणाऱ्या कॅसिनो कंपनीची 550 कोटी आयपीओची योजना 

Rakesh Jhunjhunwala: DeltaTech या कॅसिनो कंपनीमध्ये राकेश झुनझुनवाला यांची 3.37 टक्के हिस्सेदारी आहे.

FOLLOW US: 
Share:

मुंबई : सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण सुरु आहे. परंतु अशातही गुंतवणूकदारांना आयपीओमधून पैसे कमविण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. कारण डेल्टा कॉर्पची उपकंपनी डेल्टा टेकने आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. डेल्टाटेकने सादर केलेल्या प्रारंभिक आयपीओ दस्तऐवज डीआरएचपीनुसार कंपनी आयपीओद्वारे 550 कोटी रुपये उभारण्याचा विचार करते आहे. DeltaCorp ही DeltaTech ची मूळ कंपनी असून एक कॅसिनो कंपनी आहे.

डेल्टा कॉर्प संपूर्णपणे डेल्टा टेकच्या मालकीची आहे. कंपनी 300 कोटींचे नवीन शेअर्स जारी करणार आहे, तर विद्यमान प्रवर्तक आणि भागधारक 250 कोटींच्या ऑफर फॉर सेलद्वारे त्यांचे शेअर्स विकतील.

डेल्टा कॉर्प 2017 मध्ये विकत घेतली
डेल्टाटेक गेमिंग पूर्वी गॉसियन नेटवर्क म्हणून ओळखले जात असे. 2017 मध्ये, DeltaCorp ने कंपनी सुमारे 224 कोटी रुपयांना विकत घेतली आणि तिचे नाव बदलून DeltaTech केले. Deltatech ऑनलाइन पोकर वेबसाइट 'Adda52' चालवते. डेल्टाकॉर्प ही टेक्सटाईल आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी कंपनी म्हणून 1990 मध्ये सुरू झाली. आता ते कॅसिनो गेमिंग, ऑनलाइन गेमिंग, हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट सारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

राकेश झुनझुनवालाही भागीदार
शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांची कंपनीत 3.37 टक्के हिस्सेदारी आहे. मात्र, त्यांनी आपली हिस्सेदारी जवळपास निम्म्याने कमी केली आहे. यापूर्वी ते आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची डेल्टा कॉर्पमध्ये 6.12 टक्के हिस्सेदारी होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीतील आपली हिस्सेदारी दोन वेळा कमी केली. त्यांनी 1-10 दरम्यान 60 लाख शेअर्स विकले आणि त्यानंतर या आठवड्यात आणखी 15 लाख शेअर्स विकले. त्याच वेळी, मालमत्ता व्यवस्थापन कंपनी HDFC म्युच्युअल फंडचा डेल्टा कॉर्पमधील हिस्सा 10 जून 2022 पर्यंत 2.15 टक्क्यांनी वाढला आहे. सुधारित होल्डिंग्सनुसार, डेल्टा कॉर्पमधील एचडीएफसी एमएफचा हिस्सा 7.06 टक्क्यांवरून आता 9.21 टक्के झाला आहे. फंडाने ही माहिती नुकतीच शेअर बाजाराला दिली होती.

डेल्टा कॉर्पचे शेअर्स घसरले
डेल्टा कॉर्पचे शेअर्स 2022 मध्ये वर्षभरात 34 टक्क्यांनी घसरले आहेत. FY 2022 च्या चौथ्या तिमाहीत, DeltaCorp चा नफा वार्षिक आधारावर रु. 58 कोटींच्या तुलनेत 17 टक्क्यांनी घसरून रु. 48 कोटी झाला. कंपनीची विक्री वार्षिक आधारावर 211 कोटी रुपयांवरून 218 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Published at : 17 Jun 2022 05:34 PM (IST) Tags: Rakesh Jhunjhunwala IPO DeltaTech

आणखी महत्वाच्या बातम्या

पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!

पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!

Traditional And Unified KYC : पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

Traditional And Unified KYC : पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Tata IPO : गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

Tata IPO :  गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

टॉप न्यूज़

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात

मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर