एक्स्प्लोर
LIC Listing News: एलआयसीची उद्या लिस्टिंग, गुंतवणुकदारांची धाकधूक वाढली
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/16/0b8d8de3902db73fe383793ceee712ae_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
LIC Listing News: एलआयसीची उद्या लिस्टिंग, गुंतवणुकदारांची धाकधूक वाढली
1/7
![देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) उद्या शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्ट) होणार आहे. एलआयसीचा आयपीओ विक्रमी सहा दिवस बोलीसाठी खुला होता. एलआयसीच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभला. मागील आठवड्यात एलआयसी आयपीओचे वाटप करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/16/4efdd2f969559e8b1c92e99f32ded48e507ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) उद्या शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्ट) होणार आहे. एलआयसीचा आयपीओ विक्रमी सहा दिवस बोलीसाठी खुला होता. एलआयसीच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभला. मागील आठवड्यात एलआयसी आयपीओचे वाटप करण्यात आले.
2/7
![आयीपीओ मिळालेल्या गुंतवणुकदारांच्या डिमॅट खात्यात आज एलआयसीचे शेअर्स जमा होणार आहे. त्यानंतर आता उद्या शेअर बाजारात एन्ट्री घेणार आहे. ग्रे मार्केटमध्ये (LIC IPO Grey Market Price) असलेल्या दरामुळे गुंतवणुकदारांची धाकधूक वाढली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/16/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9c2c8b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयीपीओ मिळालेल्या गुंतवणुकदारांच्या डिमॅट खात्यात आज एलआयसीचे शेअर्स जमा होणार आहे. त्यानंतर आता उद्या शेअर बाजारात एन्ट्री घेणार आहे. ग्रे मार्केटमध्ये (LIC IPO Grey Market Price) असलेल्या दरामुळे गुंतवणुकदारांची धाकधूक वाढली आहे.
3/7
![ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या आयपीओ लिस्टिंगसाठी असलेल्या दरात सध्या घसरण सुरू आहे. एलआयसीचा आयपीओ खुला झाल्यानंतरच्या एक दोन दिवसात ग्रे मार्केट प्रीमियम प्राइस 95 रुपयांहून अधिक झाली होती. त्यानंतर हा दर सातत्याने घसरत आहे. एका आघाडीच्या टॉप शेअर ब्रोकर फर्मने सांगितलेल्या माहितीनुसार, सध्या एलआयसीचा आयपीओ प्रीमियम दर हा सध्या शून्य ते 19 रुपयांपर्यंत आहे. तर, IPO Watch वर एलआयसी आयपीओचा प्रीमियम दर उणे 25 रुपये दाखवण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/16/135007e7085979a7d5b41ce54c0e54d795854.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या आयपीओ लिस्टिंगसाठी असलेल्या दरात सध्या घसरण सुरू आहे. एलआयसीचा आयपीओ खुला झाल्यानंतरच्या एक दोन दिवसात ग्रे मार्केट प्रीमियम प्राइस 95 रुपयांहून अधिक झाली होती. त्यानंतर हा दर सातत्याने घसरत आहे. एका आघाडीच्या टॉप शेअर ब्रोकर फर्मने सांगितलेल्या माहितीनुसार, सध्या एलआयसीचा आयपीओ प्रीमियम दर हा सध्या शून्य ते 19 रुपयांपर्यंत आहे. तर, IPO Watch वर एलआयसी आयपीओचा प्रीमियम दर उणे 25 रुपये दाखवण्यात येत आहे.
4/7
![एखाद्या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होण्यापूर्वी ग्रे मार्केट त्याला कसा प्रतिसाद देतो यावर लिस्टिंग प्रीमियमचा अंदाज बांधला जातो. एलआयसीने आपल्या एका शेअरची किंमत 949 रुपये ठरवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/16/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefbe595.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एखाद्या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होण्यापूर्वी ग्रे मार्केट त्याला कसा प्रतिसाद देतो यावर लिस्टिंग प्रीमियमचा अंदाज बांधला जातो. एलआयसीने आपल्या एका शेअरची किंमत 949 रुपये ठरवली आहे.
5/7
![सध्या ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम दर 0 ते 19 रुपये सुरू आहे. याचा अर्थ 949 रुपये + 19 रुपये या किंमतीवर एलआयसीचा शेअर लिस्ट होण्याचा अंदाज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/16/156005c5baf40ff51a327f1c34f2975b7b9b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम दर 0 ते 19 रुपये सुरू आहे. याचा अर्थ 949 रुपये + 19 रुपये या किंमतीवर एलआयसीचा शेअर लिस्ट होण्याचा अंदाज आहे.
6/7
![उद्या एलआयसी शेअर बाजारात डिस्काउंटमध्येही लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य (मार्केट कॅप) 6 लाख कोटींहून अधिक राहण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास, एलआयसी ही शेअर बाजारात लिस्ट होणारी भारतातील पाचवी मोठी कंपनी ठरणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/16/4efdd2f969559e8b1c92e99f32ded48eab3ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उद्या एलआयसी शेअर बाजारात डिस्काउंटमध्येही लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य (मार्केट कॅप) 6 लाख कोटींहून अधिक राहण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास, एलआयसी ही शेअर बाजारात लिस्ट होणारी भारतातील पाचवी मोठी कंपनी ठरणार आहे.
7/7
![बाजार भांडवल दराच्या मूल्यानुसार, सध्या एलआयसीपेक्षा रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांचे बाजार भांडवल अधिक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/16/156005c5baf40ff51a327f1c34f2975b8cf2f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाजार भांडवल दराच्या मूल्यानुसार, सध्या एलआयसीपेक्षा रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांचे बाजार भांडवल अधिक आहे.
Published at : 16 May 2022 05:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)