Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
Baba Siddique Death Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपीच्या चौकशीतून मुंबई पोलिसांना नवी माहिती मिळाली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबरला म्हणजेच विजयादशमीला गोळा झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी घटना स्थळावरुन दोन आरोपींना अटक केली होती. गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यपला अटक केली होती. शिवकुमार गौतम गोळीबार केल्यानंतर फरार झाला होता. अद्याप तो फरार आहे. मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीप्रमाणं या प्रकरणातील तीन आरोपी पुण्याहून गोळीबाराची चौकशी करण्यासाठी झारखंडला गेल्याची माहिती समोर आली आहे. गौरव अपुने, रुपेश मोहोळ आणि शुभमन लोणकर पुण्याहून झारखंडला गेले होते. यामुळं लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवादी कनेक्शन समोर आलंय, असं दिसून येतं.
झारखंडमध्ये गोळीबाराचा सराव
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार गौरव अपुने, रुपेश मोहोळ, शुभम लोणकर पुण्याहून गोळीबाराचा सराव करण्यासाठी झारखंडला गेल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. गौरव अपुने यानं चौकशीमध्ये झारखंडच्या नक्षलग्रस्त भागात गेल्यानंतर तिथं कुणीतरी एके-47 दिली होती. पोलिसांच्या माहितीनुसार तिघांनी गोळीबाराचा सराव केला होता.
लॉरेन्स बिश्नोई गँग आणि नक्षलवादी सोबत काम करत असतील ही गंभीर बाब आहे. आम्ही या अँगलनं देखील चौकशी आणि तपास करत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं. एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार नक्षलग्रस्त भाग आहे तिथं अत्याधुनिक शस्त्रांच्या वापराचा सराव करणं साधारण बाब असल्याचं म्हटलं. पोलिसांकडून बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन आहे का किंवा काही नक्षलवाद्यांकडून त्यांची मदत केली जातेय का याची चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्यावतीनं शुभम लोणकर यानं फेसबुक पोस्ट करत हत्येची जबाबदारी स्वीकरली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गोळीबार करणाऱ्या तीन पैकी दोन आरोपींना घटनास्थळावरुन अटक करण्यात आली होती. तर, शिवकुमार गौतम अद्याप फरार आहे. याशिवाय शुभम लोणकर देखील फरार आहे. शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकरनं आरोपींनी वापरलेली दुचाकी पुण्यातून मुंबईला पोहोचवली होती.
इतर बातम्या :