लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
तुमचे लाडके भाऊ जिंकून आले तर 1500 रुपये एवजी लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये मिळतील असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
Devendra Fadnavis : तुमचे लाडके भाऊ जिंकून आले तर 1500 रुपये एवजी लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये मिळतील आणि जर सावत्र भाऊ निवडून आले तर योजना बंद करतील असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, जर तुमच्या कुटुंबीयांनी मतदान इकडे तिकडे केलं, तर दोन दिवस त्यांना जेवायला देऊ नका असेही फडणवीस म्हणाले. पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
1500 रुपये प्रति महिना वरून 2100 रुपये मिळणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या वतीनं 10 हमींची घोषणा केली आहे. यामध्ये लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणारी रक्कम 1500 रुपये प्रति महिना वरून 2100 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. आता यामध्ये वाढ करण्याचा निर्णय गेतला आहे. महायुतीचे सरकार आले तर महिलांना आता 2100 रुपये मिळणार आहेत. दरम्यान, दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडी सरकारनं देखील महिलांसाठी मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे.
सुरक्षा वाढविण्यासाठी 25,000 महिलांची पोलीस दलात भरती
महायुतीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी विविध निर्णय जाहीर केले आहेत. महिलांसाठी वाढीव मासिक मदत: महिलांसाठी मासिक मदत 1500 रुपयावरुन 2100 करण्यात येणार. सुरक्षा वाढविण्यासाठी 25,000 महिलांना पोलीस दलात भरती करण्याची योजना. शेत कर्जमाफी आणि विस्तारित शेतकरी सन्मान योजना: वार्षिक आर्थिक सहाय्य 12,000 वरुन 15,000 आणि MSP वर 20 टक्के सबसिडी जोडणे. सर्वांसाठी अन्न आणि निवारा: गरज असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी अन्न आणि निवारा मिळण्याची खात्री करणे. तसेच वृद्ध पेन्शन योजनेमध्ये आता 1 हजार 500 रुपयांवरून 2 हजार 100 रुपये करण्यात येणार आहेत. तसेच 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचं काम आम्ही करणार आहोत, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचं आश्वासन दिलं आहे. 25 हजार गावात रस्ते बाधण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. शहराच्या विकासाबरोबरच गावाचाही विकास करण्याचं आश्वासन दिलं आहे. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार आणि विमा सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे. विजबिलामध्ये 30 टक्के कपात करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. महायुतीचं सरकार आल्यानंतर ‘व्हिजन 2029’ हे 100 दिवसांच्या आत सादर करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या: