कमी काळात अधिक लाभ, छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा, मजबूत व्याजदर मिळवा
गुंतवणूक करताना आपल्या ठेवी सुरक्षीत आणि चांगला परतावा मिळतोय का हे पाहणं महत्वाचं आहे. पोस्ट ऑफिसच्या विविध लहान बचत योजनांवर ग्राहकांना मजबूत व्याजदर दिले जातायेत. याचा मोठा फायदा ग्राहकांना होतोय.
Small Saving Scheme: अलिकडच्या काळात नागरिकांना पैशांची गुंतवणूक करण्यासाठी विविध योजना सुरु झाल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना चांगला फायदो होतोय. दरम्यान, गुंतवणूक करताना आपल्या ठेवी सुरक्षीत आणि चांगला परतावा मिळतोय का हे पाहणं महत्वाचं आहे. पोस्ट ऑफिसच्या विविध लहान बचत योजनांवर ग्राहकांना मजबूत व्याजदर दिले जात आहेत. याचा मोठा फायदा ग्राहकांना होतोय.
एक ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी 6.9 टक्के ते 7.5 टक्के व्याजाचा लाभ
भारतात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु आजही लोक लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांवर चांगला व्याजदर मिळत आहे. याचा मोठा फायदा ठेवीदारांना होतोय. पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेल्या या योजनांमध्ये, एखाद्याला चांगल्या परताव्यासह कर सवलतीचा लाभ मिळतो. तुम्ही फक्त 500 रुपये जमा करुन पोस्ट ऑफिस बचत खाते उघडू शकता. या खात्यात जमा केलेल्या रकमेवर 4 टक्के व्याजदराचा लाभ मिळतो. पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एक ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी 6.9 टक्के ते 7.5 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे.
वार्षिक कमाल 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता
मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, सरकार 1000 ते 15 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 7.4 टक्के व्याजदराचा लाभ देत आहे. राष्ट्रीय बचत योजनेअंतर्गत ठेवींवर 7.7 टक्के व्याज दिले जात आहे. तर PPF योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास, एखाद्याला जमा केलेल्या रकमेवर 7.1 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत, तुम्ही वार्षिक कमाल 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेंतर्गत गुंतवणूक करून, महिला जमा केलेल्या रकमेवर 7.5 टक्के व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवर 8.20 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.
तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडत असलात तरी सर्व ठिकाणी तुमच्या खात्यात किमान शिल्लक राखणे फार महत्वाचे आहे, अन्यथा दंड भरावा लागतो. साधारणपणे बँकांमधील नियमित बचत खात्यावर किमान शिल्लक मर्यादा किमान 500 ते 1000 रुपये असते. परंतु पोस्ट ऑफिस बचत खाते किमान 500 रुपयांमध्ये उघडता येते. इतर बँकेप्रमाणेच तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यावरही अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. खाते उघडल्यावर तुम्हाला चेकबुक, एटीएम कार्ड, ई-बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग, आधार लिंकिंग इत्यादी सुविधा मिळतात. याशिवाय तुम्ही या खात्यावर सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देखील घेऊ शकता.
महत्वाच्या बातम्या: