(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wheat Producer: भारत बनला जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश, जाणून घ्या या मागचं कारण
Wheat Producer Company in India : भारत जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश बनला आहे. देशातील कृषी उत्पादकता वाढवण्यात हरित क्रांतीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Wheat Producer Company in India : भारत जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश बनला आहे. देशातील कृषी उत्पादकता वाढवण्यात हरित क्रांतीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. हरितक्रांती 1960 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून देशातील गव्हाच्या उत्पादनात सुमारे 1,000 टक्के वाढ झाली आहे.
इतके गव्हाचे उत्पादन
केंद्र सरकारच्या डेटा चार्टनुसार, 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला देशाचे एकूण गव्हाचे उत्पादन 98.5 लाख टन होते. जे 2021-22 मध्ये वाढून 1,068.4 लाख टन झाले. गेल्या आर्थिक वर्षात भारताने विक्रमी 70 लाख टन अन्नधान्याची निर्यात केली आहे.
3 पटीने धान्य उत्पादन वाढले
केंद्र सरकार म्हणते की, हरित क्रांतीने कृषी उत्पादकता वाढवण्यात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. आज धान्याचे एकूण उत्पादन हेक्टरी 3 पटीने वाढले आहे. 1960 च्या मध्यात प्रति हेक्टर धान्य उत्पादन 757 किलो होते. जे 2021 मध्ये वाढून 2.39 टन झाले आहे.
2021-22 या आर्थिक वर्षात देशात विक्रमी 31.57 कोटी टन अन्नधान्याचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. प्रमुख कृषी उत्पादनाच्या चौथ्या आगाऊ अंदाजानुसार, हा आकडा 2020-21 च्या कापणीच्या हंगामापेक्षा 49.8 लाख टन अधिक आहे. 2021-22 मधील उत्पादन मागील 5 वर्षांच्या (2016-17 ते 2020-21) सरासरी उत्पादनापेक्षा 2.5 कोटी टन अधिक असू शकते.
गव्हाचे उत्पादन वाढेल
देशात 2021-22 या वर्षात 10.68 कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी 10.38 कोटी टन उत्पादनापेक्षा हे प्रमाण 29.6 लाख टन अधिक आहे. या कालावधीत प्रमुख खरीप पीक भात लागवडीखालील क्षेत्र मागील हंगामातील 343.7 लाख हेक्टरवरून 8 टक्क्यांनी घटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने याच वर्षी 14 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गहू बंदरांवर जमा झाला होता. तसेच देशात गव्हाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली होती. यानंतर सरकारने जून महिन्यात ही बंद उठवली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: