एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

HDFC, येस बँक ते गॅस सिलिंडर, 1 मे पासून 'हे' नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

येत्या एक मे पासून एचडीएफसी, येस बँकेच्या नियमात बदल होणार आहे. गॅस सिलिंडरच्या दरतही बदल होण्याची शक्यता आहे.

मुंबई : आता लवकरच एप्रिल महिना संपणार आहे. हा महिना संपल्यानंतर मे महिन्यात काही बँकांचे नियम (New Banking Rule) बदलणार आहेत. एलपीजी सिलिंडरचाही (Gas Cylinder Price) भाव बदलण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांमुळे सामान्य लोकांच्या खिशावर थेट परिणाम पडणार आहे. त्यामुळे बदललेल्या नियमांची योग्य माहिती असल्यास तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करता येईल. येत्या 1 मेपासून अनेक नियमांत बदल होणार आहे. 

येस बँकेच्या खात्याबाबत काय नियम बदलणार?  

येस बँकेच्या सेव्हिंग खात्याबाबत येत्या 1 मेपासून काही नियम बदलणार आहेत. येस बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार बँकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांवरील किमान सरासरी ठेवीमध्ये (मिनिमम अॅव्हरेज बँलेन्स) बदल करण्यात आला आहे. येस बँकेच्या प्रो मॅक्स प्रकारच्या खात्यावरील मिनिमम अॅव्हरेज बँलेस 50,000 रुपये होणार आहे. सेव्हिंग अकाऊंट प्रो प्लस Yes Respect SA तसेच Yes Essence SA या खात्यांमध्ये मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स 25,000 रुपये करण्यात आले आहे. Account PRo प्रकारच्या बँक खात्यात दहा हजार मिनिमम बॅलेन्सची अट ठेवण्यात आली आहे. 

ICICI Bank बँकेचे नवे नियम काय असणार?

आयसीआयसीआय बँकेचेही येत्या 1 मेपासून अनेक नियम बदलणार आहेत. ही बँक सेव्हिंग खात्यांच्या सर्व्हिस चार्जेसमध्ये बदल करणार आहे. तुम्ही ग्रामीण भागातील ग्राहक असाल तर तुम्हाला ICICI बँकेच्या डेबिट कार्डवर 99 रुपये, शहरी भागातील ग्राहक असाल तर 200 रुपये फी (प्रतिवर्ष) द्यावी लागणार आहे. तुम्हाला बँकेचे 25 पानांचे चेक बुक हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. 25 पेजनंतर चेकबुकच्या प्रत्येक पानासाठी तुम्हाला 4 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. तुम्हाला आयएमपीएसने एक हजार रुपयांपर्यंतचे ट्रान्जेक्शन करत असाल तर प्रति ट्रान्जेशन 2.50 रुपये द्यावे लागतील. 1 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत ट्रान्जेशन करत असाल तर पाच रुपये प्रति ट्रान्जेशन फी द्यावी लागेल.

HDFC कडून स्पेशल एफडीला मुदतवाढ 

HDFC ही बँक खासगी बँकिंग क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे. या बँकेडकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एफडीय योजना म्हणजेच एचडीएफसी बँक सीनियर सिटीझन केअर एफडी योजना राबवली जाते. या योजनेच्या मुदतीत 10 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. बँक या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्क्यांचं अतिरिक्त व्याज देत आहे. या योजनेनुसार ग्राहकांना 5 ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडी स्कीम वर 7.75  टक्के व्याज दराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच कोटी रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतात. 

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होणार? 

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून घरगुती आणि व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांत बदल करते. त्यामुळे एक मे रोजी गॅस सिलिंडरच्या दरातही बदल होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा :

एकही रुपया न देता आधारकार्ड अपडेट करता येणार, नेमकं कसं? जाणून घ्या..

मसाल्यांमुळे होऊ शकतो कॅन्सर? चार मसाल्यांची विक्री थांबवण्याचा आदेश!

इराण-इस्रायल यांच्यातील तणावाचा भारताला फटका? निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल महागणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Bhor on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या पठ्ठ्याने कारण सांगितलंRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्तीRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget