एक्स्प्लोर

एकही रुपया न देता आधारकार्ड अपडेट करता येणार, नेमकं कसं? जाणून घ्या..

सध्या तुम्हाला कोणतेही शुल्क न देता आधार कार्ड अपडेट करता येऊ शकते. त्यासाठी UIDAI ने नवी संधी दिली आहे.

मुंबई : आधार कार्ड ही देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक ओळखपत्र आहे. कोणत्याही शासकीय किंवा खासगी कामासाठी आधारकार्ड लागतेच. याच आधारकार्डमध्ये काही त्रुटी असल्यावर ऐनवेळी मोठी पंचाईत होते. हीच अडचण होऊ नये यासाठी यूआयडीएआयने लोकांना एक मोठी संधी दिली आहे. आता कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आधारकार्डमधील माहिती अपडेट करता येणार आहे. यूआयडीएआयने नेमका काय निर्णय घेतला आहे? मोफत आधारकार्ड अपडेट करायचे असेल तर काय करायला हवे? त्यासाठीची पूर्ण प्रक्रिया काय आहे? हे जाणून घेऊ या...

...तर कोणतेही शुल्क लागणार नाही

ज्या लोकांच्या आधारकार्डला दहापेक्षा अधिक वर्षे झालेले आहेत, त्यांनी ते अपडेट करू न घ्यावे, असे UIDAI ने नागरिकांना सांगितले होते. त्यासाठी यूआयडीएआयने लोकांना मोफत आधारकार्ड अपडेटिंगचा ऑप्शन दिला होता. या सुविधेचा कालवधी अनेकवेळा वाढवण्यात आला होता. याआधी मोफत आधार अपडेट करण्यासाठीची मुदत 14 मार्च ठेवण्यात आली होती. मात्र नंतर ही मुदत 14 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली. तुम्ही स्वत: 14 जूनपर्यंत तुमचे आधारकार्ड अपडेट करत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क लागणार नाही. आधार केंद्रावर जाऊन तुम्ही तुमची माहिती अपडेट करण्याचं ठरवल्यास मात्र तुम्हाला शुल्क द्यावे लागू शकते. 

14 जूनपर्यंत मुदतीत वाढ

आधारकार्डवरील माहिती वेळेत अपडेट न केल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याआधी मोफत आधार अपडेट करण्याची तारीख ही 2023 होती. त्यानंतर ती 14 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली. आता हीच मुदत 14 जून 2024 पर्यंत वाढण्यात आली आहे. सामान्यत: आधारकार्डवरील माहिती अपडेट करायची असल्यास तुम्हाला 50 रुपयांपर्यंतचे शुल्क द्यावे लागायचे. मात्र आता तुम्ही हीच माहिती 14 जूनपर्यंत विनाशुल्क अपडेट करता येऊ शकते.

आधारकार्ड कसे अपडेट करावे? 

आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सर्वांत अगोदर तुम्हाला UIDAI च्या  https://uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. 

त्यानंतर अधिकृत वेब पेजवर गेल्यानंतर My Aadhaar Portal वर क्लीक करावे.

त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून लॉगीन करावे.

त्यानंतर देण्यात आलेली सर्व माहिती वाचून ओके बटणावर क्लीक करावे. 

तुम्हाला तुमची माहिती अपडेट करायची असेल तर ड्रॉप डाऊन मेन्यूवर जाऊन डॉक्यूमेट्स ऑप्शनवर क्लीक करा. 

तुम्ही तुमचे डॉक्यूमेंट अपलोड केल्यावर तुमच्या आधारकार्डवरील माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया चालू होईल.

ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. 

पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर एसआरएन नंबर जनरेट होईल. या नंबरच्या मदतीने तुम्ही अपडेट केलेली माहिती ट्रॅक करू शकता. 

UIDAI कडून पूर्ण माहिती तपासून झाल्यावर तुमची माहिती अपडेट केली जाईल.

हेही वाचा :

EPF क्लेम स्टेटस नेमकं कसं चेक करायचं? समजून घ्या सोप्या शब्दांत!

चार नवे आयपीओ येणार, मालामाल होण्याची नामी संधी; पैसे गुंतवण्याआधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

उर्जानिर्मिती करणाऱ्या 'या' कंपनीचा शेअर तुम्हाला करू शकतो मालामाल; 'हे' आहे कारण!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget