GST Collection: सरकारच्या तिजोरीत भर! सप्टेंबर महिन्यात GST संकलनात मोठी वाढ; वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर
सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात GST कलेक्शन झालं आहे. GST कलेक्शनच्या दृष्टीनं सप्टेंबर महिना उत्कृष्ट राहिला आहे.
GST Collection in September 2023 : सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात GST कलेक्शन झालं आहे. GST कलेक्शनच्या दृष्टीनं सप्टेंबर महिना उत्कृष्ट राहिला आहे. सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलन पुन्हा एकदा 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. चालू आर्थिक वर्षात GST संकलन 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची ही चौथी वेळ आहे.
जेव्हा कोणत्याही एका महिन्यात संकलनाचा आकडा 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता त्यावेळी वार्षिक आधारावर दर महिन्याला जीएसटी संकलनातही वाढ होण्याचा ट्रेंड आहे. वित्त मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सरकारी तिजोरीला सप्टेंबर महिन्यात जीएसटीमधून 1,62,712 कोटी रुपये मिळाले. जे सप्टेंबर 2022 पूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत 10 टक्के अधिक आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात GST मधून सरकारला आतापर्यंत 9,92,508 कोटी रुपये मिळाले आहेत. अशा प्रकारे, चालू आर्थिक वर्षात सरकारचे सरासरी मासिक संकलन आतापर्यंत 1.65 लाख कोटी रुपये आहे. जे वार्षिक आधारावर 11 टक्के वाढ आहे.
दर महिन्याला संकलनात वाढ
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सरकारला जीएसटीमधून 1,59,069 कोटी रुपये मिळाले होते. हे 6 महिन्यात प्रथमच 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी संकलन होते. त्याआधी, सरकार मार्च 2023 नंतर दरमहा 1.60 लाख कोटी रुपयांहून अधिक गोळा करत होते. एका वर्षापूर्वीची तुलना केल्यास, ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन देखील चांगले होते. कारण ऑगस्ट 2022 च्या तुलनेत संकलनात 11 टक्क्यांची वाढ झाली होती.
एप्रिल 2023 मध्ये सरकारी तिजोरीत सर्वाधिक भर
2023-24 हे आर्थिक वर्ष जीएसटीच्या दृष्टीने खूप चांगले ठरत आहे. एप्रिलमध्ये सरकारी तिजोरीत 1.87 लाख कोटी रुपये आले. तेव्हा या आर्थिक वर्षाची सुरुवात एका नव्या विक्रमाने झाली. हे एका वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिल 2022 च्या तुलनेत 12 टक्के अधिक होते. तसेच, आत्तापर्यंत कोणत्याही एका महिन्यात जीएसटी संकलनाचा हा सर्वोत्तम आकडा होता.
कसा मिळाला कर
सप्टेंबर महिन्यात सरकारला केंद्रीय जीएसटीमधून 29818 कोटी रुपये, राज्य जीएसटीमधून 37657 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटीमधून 83623 कोटी रुपये मिळाले आहेत. इंटिग्रेटेड जीएसटीच्या आकडेवारीत वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या 41,145 कोटी रुपयांचाही समावेश आहे. सरकारला सेसमधून 11,613 कोटी रुपये मिळाले आहेत. ज्यामध्ये आयातीतून 881 कोटी रुपये मिळाले आहेत. या कालावधीत, सरकारनं एकात्मिक जीएसटीमधून केंद्रीय जीएसटी आणि राज्य जीएसटीमध्ये अनुक्रमे 33,736 कोटी रुपये आणि 27,578 कोटी रुपये सेटल केले. अशा प्रकारे, सप्टेंबर 2023 मध्ये, केंद्रीय GST मधून सरकारचे एकूण उत्पन्न 63,555 कोटी रुपये आणि राज्य GST मधून 65,235 कोटी रुपये होते.
महत्त्वाच्या बातम्या: