कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारचा प्लॅन, देशातील 'या' शहरात मिळतोय स्वस्तात कांदा
Onion Prices : ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं देशातील काही शहरांमध्ये स्वस्त दरात म्हणजे 35 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री सुरु केली आहे.
Onion Prices : सध्या कांद्याच्या दरात (Onion Price) वाढ होत आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळत आहे. मात्र, वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं देशातील काही शहरांमध्ये स्वस्त दरात म्हणजे 35 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री सुरु केली आहे. पण देशातील कोण कोणत्या शहरात कमी दरात कांद्याची विक्री सुरु आहे, याबाबतची तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
देशातील विविध शहरांमध्ये स्वस्त दरात कांदा विक्री सुरु
कांद्याच्या वाढत्या दरापासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकारानुसार देशात अनेक ठिकाणी स्वस्तात कांदा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. देशाच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने केवळ 35 रुपये प्रति किलो दराने कांदा विक्री सुरु केली आहे. यामध्ये सरकारने दिल्ली-एनसीआर ते चेन्नई, जयपूर, रांची, कोलकाता अशा ठिकाणी फक्त 35 रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल व्हॅन तैनात केल्या आहेत. सरकारनेही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. विविध ठिकाणी केलेल्या कांदा विक्री व्यवस्थेची माहिती सरकारनं दिली आहे.
'या' ठिकाणी कमी दरात कांदा विक्री सुरु
देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका
दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. झारखंड, महाराष्ट्र, हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे. त्यामुळं निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचंह बोललं जात आहे.
अफगाणिस्तानातून भारतात लाल कांद्याची आयात
सध्या कांद्याचे दर वाढत आहेत. यामुळं शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येत आहेत. अशा स्थितीतच सरकारने अफगाणिस्तानचा लाल कांदा आयात केला आहे. भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कांद्याची आयात न थांबवल्यास नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदे फेकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे..लोकसभा निवडणुकीत कांदा मुद्द्यावर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागले होते. आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा अफगाणिस्तानचा कांदा सरकार आयात करतय.
महत्वाच्या बातम्या: