मोदी सरकारने कांद्यावरचे निर्यात मूल्य घटवले, पण सिस्टीमच अपडेट केली नाही, ते जहाज निघून गेल्यास 300 कंटेनर्समधील कांदा सडणार
केंद्र सरकारने अधिसूचना काढत कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले. त्यामुळे कांदा निर्यातीला चालना मिळणार आहे. परंतु व्यापारी आणि निर्यातदारांचे प्रचंड हाल होत आहेत.
Onion Export : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले आहेत. तसेच निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरुन 20 टक्के करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. परंतु निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर देखील कांदा व्यापारी आणि निर्यातदारांच्या अडचणी मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. केंद्र सरकारकडून निर्णय झाल्यानंतर देखील सिस्टीम अपडेट न झाल्याने लाखो टन कांदा बॉर्डरवर (सीमेवर) अडकला आहे. बांगलादेश बॉर्डर वर 100 ट्रक तर मुंबई पोर्टवर देखील 300 कंटेनर अडकून पडले आहे.
केंद्र सरकारने अधिसूचना काढत कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले. त्यामुळे कांदा निर्यातीला चालना मिळणार आहे. परंतु व्यापारी आणि निर्यातदारांचे प्रचंड हाल होत आहेत. कारण सिस्टीम अपडेट नसल्याने कागदपत्र तयार करण्यास अडचण येत आहे. तसेच जहाज निघून गेल्यास लाखो टन कांदा सडून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेय केंद्रीय पातळीवरून हस्तक्षेप करण्याची कांदा निर्यातदारांनी मागणी केली आहे.
कांद्याच्या गाड्या अडकून पडल्या
कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्यांवरून 20टक्यांवर आणले तरी अद्याप याबाबत जेएनपीटी बंदरात या विषयी काही अपडेट नाही. 20 टक्के शुल्क केले असले तरी जेएनपीटी बंदर प्रशासनाने त्यांच्या सिस्टममध्ये सुधारणा न केल्याने निर्यात थांबली आहे. निर्यात होत नसल्याने नाशिकमध्येच कांद्याच्या गाड्या अडकून पडल्या आहेत. यामुळे कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे.
श्रीलंका, बांग्लादेश, गल्फ कंट्री, मलेशियातून कांद्याला मागणी
कांदा निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कमध्ये बदल केल्यानंतर कांदा निर्यातीला वेग येणार आहे. श्रीलंका, बांग्लादेश, गल्फ कंट्री, मलेशिया या देशातून कांद्याच्या मागणीला सुरुवात झाली आहे. या निर्णयानंतर नाशिक जिल्ह्यात 400 ते 500 रुपयांनी कांद्याचे दर देखील वाढले आहेत. कांदा निर्यात देखील वेगाने सुरू होण्याची शक्यता वर्तवण्याच येत होती. परंतु सिस्टीम अपडेट न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
निर्यातबंदी संदर्भात यापूर्वी आलेल्या अधिसूचना...
- 19 ऑगस्ट 2023 कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले होते...
- 28 ऑक्टोबर 2023 ला कांद्यावर 800 डॉलर प्रति मेट्रिक टन निर्यातमूल्य लावले होते..
- 7 डिसेंबर 2023 निर्यातबंदी करण्यात आली होती...
- 4 मे निर्यातबंदी उठवली मात्र निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले होते आणि 550 डॉलर किमान निर्यात मूल्य लावण्यात आले..
- 13 सप्टेंबरला कांदा निर्यात वरील 550 डॉलर निर्यातमूल्य रद्द..
हे ही वाचा: